महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – राज्याचे माजी मंत्री आणि आमदार अमित देशमुख यांच्या मतदारसंघातील विकासकामासाठी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नातून 5 कोटींचा आमदार निधी मिळाला आहे आणि निधीतून लातुर शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 13 मधिल रामायण
बिल्डिंग ते हनुमान मंदिर पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे उदघाटन औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यु पवार यांचे चिंरजीव परीक्षित पवार यांच्या हास्ते आज पार पडले अशी एक सोशल मीडियावर पोस्ट करून अभिमन्यू पवार यांच्या जवळचे रविशंकर केंद्रे यांनी माहीती दिली . उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे
विश्वासू असलेले अभिमन्यू पवार यांना औसा मतदारसंघातील जनतेने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आणले आणि आमदार अभिमन्यू पवार यांनी आपले परम कर्त्यव्य मानून औसा मतदारसंघात सर्वांगीण विकासाची गंगा आणली हे दिसून येत आहे. आता ही विकास गंगा माजी मंत्री
आमदार अमित देशमुख यांच्या लातूर शहर मतदारसंघात आली आहे, आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूर शहराच्या विकासासाठी 5 कोटींचा आमदार निधी मिळवून दिला आहे आणि लातुर शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 13 मधिल रामायण बिल्डिंग ते हनुमान मंदिर पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे उदघाटन आमदार अभिमन्यु
पवार यांचे चिंरजीव परीक्षित पवार यांच्या हस्ते उदघाट्न ही केले, विकासकामाची गती तर माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या कामाची पण कधी लातूरकरांनी पहिली नाही ! तिसरी वेळेस आमदार राहिलेले आमदार अमित देशमुख यांचे लातुर शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 13 मधिल विकास कामाकडे लक्ष गेले नाही तेच
लक्ष पहिल्यांदा निवडून आलेले औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांना दिसले आणि सुपरफास्ट 5 कोटींचा आमदार निधी उभा करून आपल्या चिरंजीवांच्या हस्ते कामाचे उदघाट्न ही केले, आमदार अभिमन्यू पवार यांच्या लातूर शहराच्या विकास विकासात असाच हातभार लागेल अशी लातूरकरांना अशा निर्माण झाली आहे. या उदघाट्न
प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजप युवा मोर्चा ,दयानंद सरस्वती मंडळाचे मंडळ अध्यक्ष विशाल हवा पाटिल माजी नगरसेविका अर्चनाताई अल्टे, बालाजी नागरगोजे सुर्यभान सगर, गुरुनाथ कल्लुरकर, पवण अल्टे, किशोर जाधव, प्रितम सोळंके उपस्थित होते .