लातूर जिल्हा

लातूर सह महाराष्ट्रातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डॉ. धर्मवीर भारती यांची लायन्स क्लब ऑफ् लातूर सिटीच्या अध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहराला बांधकाम क्षेत्रातील वेगळी ओळख निर्माण करून देणारे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डॉ. धर्मवीर भारती यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पद भूषवले आहे. लातूर येथील लायन्स क्लब ऑफ् लातूर सिटीच्या अध्यक्षपदी लातूर सह

महाराष्ट्रातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डॉ. धर्मवीर भारती यांची निवड करण्यात आली आहे. 2023 – 24 साठी लायन्सची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. लायन्स क्लब ही सामाजिक संस्था जागतिक स्तरावर काम करणारी संस्था आहे. साधारण 210 देशांत लायन्सचे काम सुरू आहे. लायन्स क्लबच्या कामाचा

विस्तार लक्षात घेता क्लबच्या विविध विंग आहेत. डॉ. धर्मवीर भारती यांचे अध्यक्ष पदावरील उल्लेखनीय सामाजिक काम लक्षात घेता त्यांची फेरनिवड करण्यांत आली आहे. नूतन कार्यकारिणी निवडीसाठी बैठक घेण्यात आली. यात ‘संचिव नागनाग गित्ते, उपाध्यक्ष अँड. संगेप्पा परमा, अनिल झंवर, कोषाध्यक्ष अँड. योगेश शिंदे, तर

जनसंपर्क” प्रमुख म्हणून अनिल पुरी यांची निवड करण्यात आली. यावेळी लायन्स क्लबचे ‘ रांजेश मित्तल, जगदिश डेट्टा, व्यंकट ठंणंके, बस्वराजञ मंंगरुळे, सुहास पाचेगावकर, मनोज देशमुख, लक्ष्मीकांत कालिया, आदींची प्रमुख उपस्थिती होती. नूतन कार्यकांरिणीचे स्वागत होत आहे.

Most Popular

To Top