DYSP च्या घराबाहेरुन पोलिस कर्मचाऱ्याची दुचाकी चोरट्यांनी केली लंपास

महाराष्ट्र खाकी (जळगाव / प्रतिनिधी) – जळगाव शहरातील मानराज पार्कजवळील द्रौपदीनगरात परिविक्षाधीन DYSP यांच्या घराबाहेरुन पोलिस कर्मचाऱ्याची दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेली. जळगाव जिल्‍हा पोलिस दलास सध्या दोन परिविक्षाधीन DYSP लाभले आहेत. अप्पासाहेब पवार आणि श्री. कुळकर्णी या

दोघा प्रशिक्षणार्थी DYSP यांनी जळगाव उपविभागात अवैध धंद्यांविरूद्ध कारवाईचा सपाटाच सुरु केला आहे. गुटखा, पानमसला, वाळूसह अवैध व्यवसायांवर सलग कारवाई सुरु असल्याने अवैध व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण आणि जनसामान्यांमध्ये दोघांची बऱ्यापैकी चर्चा आहे. परिविक्षाधीन कालावधीत शासकिय निवासस्थान उपलब्ध नसल्याने अप्पासाहेब

पवार हे मानराजपार्क परिसरातील द्रौपदीनगर येथे भाडेतत्त्वावरील घरात वास्तव्याला आहेत. त्यांच्याकडे कार्यरत पोलिस कर्मचारी हिरालाल गुमळकर (रा. पोलिस वसाहत) हे शनिवारी (ता. 27 ) सायंकाळी सातला खासगी दुचाकी ( MH19 BX 5592 ) द्वारे ड्युटीवर आले होते. वाहन

बंगल्याबाहेरच उभे करुन ते रात्रभर ड्युटीवर होते. पहाटे सहाला घरी जाण्यासाठी वाहन शोधत असताना दुचाकी न आढळल्याने त्यांनी चौकशी केली. तरीही वाहन सापडत नसल्याने अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची खात्री झाल्यावर त्यांनी जिल्‍हापेठ पोलिस स्टेशन गाठत या प्रकरणी तक्रार दिली. त्यावरून गुन्ह्याची नोंद झाली असून, पोलीस नाईक जुबेर तडवी तपास करीत आहेत.

Recent Posts