Latur police LCB पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात मोबाईल हिसकावणाऱ्या जबरीचोरी मधील 4 आरोपींना मुद्देमालासह अटक

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यातील अवैद्य धंदे असो वा चोरी, खून किंवा इतर गुन्ह्यांची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे आणि त्यांच्या टिमचे खूप मोठे योगदान असते. पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे कार्य

उल्लेखनीय आणि कौतुकास्पद राहिले आहे. पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचने अशाच एका गुन्ह्याची उकल केली आहे. काही दिवसांपूर्वी अनोळखी आरोपींनी पोलीस ठाणे शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत एका मोटार सायकल स्वारास अडवून जबरजस्तीने त्याच्याकडील मोबाईल

हिसकावून घेऊन जाण्याची घटना घडली होती. त्यावरून शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलावंडे यांचे नेतृत्वात पोलीस पथक तयार करण्यात आले. (LCB) स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकाने फिर्यादीकडे सखोल

विचारपूस करून त्याने सांगितलेल्या वर्णनावरून पोलीस स्टेशनच्या अभिलेखा वरील व लातूर शहरालगत असलेल्या जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांची चाचपणी चालू होती . दरम्यान दिनांक 08/05/2023 रोजी पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या विश्वासनीय व गोपनीय माहितीच्या मदतीने आरोपी 1) प्रफुल प्रकाश

पवार ,वय 23 वर्ष, राहणार गिरवलकर नगर, लातूर.
2) आकाश भरत बिराजदार, वय 24 वर्ष, राहणार न्यू भाग्यनगर, लातूर. 3) प्रद्युम्न उर्फ सोन्या सतीश माळी, वय 25 वर्ष, राहणार गातेगाव, 4) शोएब महबूब पाशा शेख, वय 23 वर्ष ,राहणार वाल्मिकी नगर ,लातूर. यांना लातूर शहरातील बार्शी रोड वरील संविधान चौक परिसरात

त्यांनी चोरलेले मोबाईल विकण्याचा प्रयत्न करीत असताना (LCL) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी लातूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटर सायकल वरून तसेच पायी जाणाऱ्या वेक्तींना अडवून त्यांच्याकडील मोबाईल जबरजस्तीने लुटले आहे, असे कबूल करून

त्यांच्या ताब्यातील चोरलेले एकूण 32 मोबाईल गुन्हे करताना वापरलेली मोटरसायकल असा एकूण 3,07,500/- रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे. या चार आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करिता शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले

असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशन चे पोलीस करत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे चे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, राजेश कंचे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे,जमीर शेख, तुराब पठाण, नितीन कठारे ,नकुल पाटील यांनी केली आहे.

 

Recent Posts