महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्हा भाजपा मधील आणि महाराष्ट्र भाजपा प्रवक्त्या असलेल्या प्रेरणा होनराव यांनी वेळोवेळी समाजातील अराजकतेबद्दल प्रखर आवाज उंच केला आहे, मग ते द काश्मीर फाईल्स चित्रपट असो वा लातूर शहरातील गो रक्षक यांच्यावर झालेल्या जीव घेण्या हल्ल्याबद्दल असो
आणि आता प्रेरणा होनराव यांनी द केराळा स्टोरी या चित्रपटवरून आपले प्रखर मत वेक्त केले आहे. द काश्मीर फाईल्सनंतर आता ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावरून देशातील वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. काही जण या चित्रपटाचे समर्थन करत असून, काही जण या चित्रपटाविरोधात सूर आळवत आहेत. पश्चिम बंगालमध्ये
तर या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील नेते मंडळींकडूनही चित्रपटासंदर्भात प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. महाराष्ट्र भाजपा प्रवक्त्या आणि लातूर भाजपा मधील अभ्यासू आणि आक्रमक चेहरा असलेल्या प्रेरणा होनराव यांनी या चित्रपटा बद्दल आपले मत वेक्त केले आहे. धर्मांतरण व लव्ह-जिहादच्या मुद्द्यावरून चर्चेत
असलेला ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या विशेष शोचे लातूर भाजप कार्यकर्त्यांनी लातुरात आयोजन करण्यात आले होते. प्रेरणा होनराव यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी आणी सामान्य नागरिकांनी हा चित्रपट पाहिला. या चित्रपटाच्या माध्यमातून कटू सत्य जनतेसमोर येत असल्याचा दावाही प्रेरणा होनराव यांनी केला. हा चित्रपट केवळ स्टोरी सांगण्यासाठी नसून जागृत करण्यासाठीच असल्याचंही त्यांनी म्हटलं.