औसा बाजार समितीला जिल्ह्यातील सर्वोत्तम बाजार समिती म्हणून नावारूपास आणू – आमदार अभिमन्यू पवार

महाराष्ट्र खाकी (औसा / विवेक जगताप ) – औसा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतील कै. गोपीनाथराव मुंडे शेतकरी जनहित पॅनेलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ लामजना पाटी येथे खरोसा व लामजना गटांमधील तसेच महादेववाडी मंदिर येथे आलमला व हासेगाव गटांमधील मतदार बंधू भगिनींची आमदार अभिमन्यू पवार यांनी

बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. “ज्या तळमळीने आमदार अभिमन्यू पवार यांनी अल्पावधीतच मतदारसंघात 1200 किमी लांबीचे शेतरस्ते निर्माण करून, 1200 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करून, हजारो शेतकऱ्यांना गोठे बांधून देऊन, निकषात बसत नसतानाही गोगलगाय नुकसानभरपाई मिळवून देऊन

आणि सुमारे 15 वर्षांपासून बंद असलेला किल्लारी कारखाना सुरु करून राज्यात शेतकरी हिताचा औसा पॅटर्न विकसित केला, त्याच तळमळीने औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार चालवून औसा बाजार समितीला जिल्ह्यातील सर्वोत्तम बाजार समिती म्हणून नावारूपास आणू” असा विश्वास आमदार अभिमन्यू पवार

यांनी मतदारांना दिला आणि येत्या 28 एप्रिल रोजी औसा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतील कै. गोपीनाथराव मुंडे शेतकरी जनहित पॅनेलच्या रोडरोलर या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करावे असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले.

Recent Posts