महाराष्ट्र खाकी ( चाकूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात लातूर पोलिसांची जिल्ह्यात कौतुकास्पद कारवाया चालू आहेत. चाकूर पोलिसांनी अशीच एक धडाकेबाज कारवाई केली
आहे. येरोळमोड परीसरात कबनसांगवी (ता.चाकूर) रोडवरील एका दुकानासमोरील होंडा कंपनीची स्कुटी अज्ञात चोरट्यांनी दि.8 मार्च वार बुधवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरली होती. याप्रकरणी चाकूर पोलीसात गुन्हा दाखल झाल्याने सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम, पोलीस निरीक्षक बालाजी
मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णू गुंडरे पोलीस शिवा चोले, तुषार खुने यांच्या पथकाने सायबर विभागाचे पो.का.शैलेश सुडे यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत असताना लोणावळा जवळ पोलीसांच्या गाडीचा अपघात झाला. तरीही पोलिसांनी दुसरी गाडी घेऊन मुंबई गाठली.
आरोपीचे घर धोकादायक ठीकाणी असल्याचे व आरोपी पकडणे जिकीरीचे असल्याची माहिती मुंबई पोलीसांनी दिलेली असतानाही पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांनी धडाकेबाज कामगीरी करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपीकडुन जिल्हृयातील इतरही चोऱ्या उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत
पोलिसांनी दिलेली माहिती अशी,येरोळमोड (ता.शिरूर अनंतपाळ) येथे अज्ञात चोरट्यांनी लातूर-उदगीर रोडवरील एका कृषी सेवा केंद्र दुकानाचे शटर वाकवून दुकान फोडण्याचा प्रयत्न केला.परंतु शटर उघडुन आत जाता आले नसल्याने व दरम्यानच्या काळात पोलीस गस्तीच्या गाड्या गस्त घालत आल्याने चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न
फसला आहे.गस्तीवर आलेल्या पोलीसांना बेवारस मालवाहु अॅटो आढळून आला .व पोलीसांनी आडबाजुचा अॅटो ढकलत रस्त्यावर सुरक्षित ठिकाणी लावला. त्यानंतर दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी चाकूर हद्दीतील कबनसांगवी रोड वरील एका दुकानासमोरील होंडा कंपनीची पांढ-या रंगाची एम.एच.24 बी.एच.7914
क्रमांकाची स्कुटी चोरली होती. याप्रकरणी रमाकांत संतराम राजारूपे यांच्या तक्रारीवरून चाकूर पोलीसात अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस हेड कॉ. विष्णू गुंडरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सायबर विभागाचे पो.कॉ.शैलेश सुडे, व सीसीटीव्ही
फुटेजच्या सहाय्याने आरोपीचा शोध घेवून धाराशिव (उस्मानाबाद) येथील रेल्वे स्थानकावरून प्रकाश मीरे रा.गंगानगर (ता.किनवट जि.नांदेड) या आरोपीस अटक केली. त्याच्या सोबतचे इतर आरोपी उल्हासनगर (मुंबई) येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे,पो.का. शिवा चोले, तुषार खुने
यांच्या पथकाने उल्हासनगर मुंबई परीसरातुन रवि मारवे रा.महारळगाव (ता.कल्याण जी.ठाणे)यांस अटक केली. व आरोपीकडुन चोरलेल्या स्कुटीचा पत्ता मिळवला आहे.पोलीसांनी सायबर विभागाच्या मदतीने चोरट्यांना पकडून चोरीस गेलेली स्कुटी मिळवली आहे.तर शिरूर ताजबंद येथील गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल
पोलिसांच्या टीमने जप्त केली आहे.त्यामुळे पोलीसांच्या कामगीरीचे कौतुक होत आहे.यातील एका आरोपीने शिरुर ताजबंद येथे चोरी केल्याची माहीती दिल्याने त्यास अहमदपूर पोलीसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक बालाजी मोहीते यांनी दिली.