महाराष्ट्र

धिरज देशमुखांनी जिल्हा बँकेच्या ठेवीदारांना ठेविवारील व्याज दर वाढउन नवीन वर्षाचे गिफ्ट

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्याच्या विकासात विशेषतः शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नती मध्ये लातूर जिल्हा बँकेचा मोठा सहभाग राहिला आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबउन खाते धारकांना आणि शेतकऱ्यांना फायदा करून दिला आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मातृत्व संस्था असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने

ठेवीदारांना घसघशीत व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला असून राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील बँकेच्या ठेवीदाराना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे जिल्हा बँकेच्या सर्व ठेवीदारांना

नवीन वर्षाच्या सुरवातीला हे मिळालेली गिफ्ट म्हणावे लागेल. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीला बँकेचे उपाध्यक्ष अँड. प्रमोद जाधव, संचालक अँड. श्रीपतराव काकडे, पृष्वीराज शिरसाठ, एन. आर. पाटील, अँड. राजकुमार पाटील, व्यंकटराव बिरादार, भगवानराव पाटील तळेगावकर, अशोकराव गोविंदपूरकर, जयेश माने, दिलीप पाटील नागराळकर, मारोती पांडे, अनुप शेळके,

संचालिका स्वयंप्रभा पाटील, लक्ष्मीबाई भोसले, सपना किसवे, कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव, विविध खाते प्रमुख व अधिकारी यांची उपस्थिती होती.तरी या नवीन व्याज दराचा ग्राहकांनी लाभ घ्यावा. आपल्या ठेवी जिल्हा बँकेत ठेवाव्यात, असे आवाहन लातूर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन तथा लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार धीरज देशमुख यांनी केले आहे.

Most Popular

To Top