LCB PI संजीवन मिरकले आणी MIDC पोलीस स्टेशनचे PI साहेबराव नरवाडे यांच्या नेतृत्वात MPDA अंतर्गत एका गुन्हेगारावर कारवाई

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप  ) – लातूर पोलिसांनी MPDA अंतर्गत जिल्ह्यातील नववी कारवाई करून कुख्यात गुन्हेगार स्वप्निल उर्फ पन्या गौतम कांबळे याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करुन नाशिक येथील कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे. लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे निर्देशाने लातूर

पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारी, अवैद्य धंदे यांचे प्रमाण कमी केले आहे तर जिल्ह्यात MPDA कायद्याअंतर्गत नववी कारवाई करून गुन्हेगारांच्या मनात पोलिसाबद्दल धडकी भरवली आहे. लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB)  पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस

निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या नेतृत्वात अशीच एक कारवाई केली आहे. लातूर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी तसेच लोकसभा निवडणूक – 2024 व मतदान प्रक्रियाच्या निमित्ताने MIDC पोलीस स्टेशन यांनी  महाराष्ट्र झोपडपट्टीदादा ( MPDA) कायद्यांतर्गंत लातूर शहरातील सुभेदार रामजी

नगर परिसरात राहणारा स्वप्निल उर्फ पन्या गौतम कांबळे, वय 24 वर्ष याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. जनसामान्यात स्वप्निल उर्फ पन्या गौतम कांबळे बद्दल भीती होती. त्याच्याकडून सार्वजनिक शांततेस धोका असल्याने आणी कुख्यात गुन्हेगार स्वप्निल उर्फ पन्या गौतम कांबळे, याच्या विरुद्ध लातूर जिल्ह्यातील विविध

पोलीस ठाण्यामध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचे एकूण  13 गुन्ह्यांची नोंद असून त्यामध्ये शस्त्रासह शरीराविरुद्ध, जबरीने मालमत्ता चोरी करण्याचे  गुन्हे, मालमत्ता चोरीचे गुन्हे ,भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे, असे एकूण 13 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. लातूर शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणार्‍या गुन्हेगारांवर वचक निर्माण

करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी लातूर पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाई  करण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB)  पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांचे नेतृत्वात प्रस्ताव केला होता, जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्षा ठाकूर

घुगे यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला आहे. स्वप्निल उर्फ पन्या गौतम कांबळे याला ‘MPDA’ कायद्याखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध करुन त्याची 26 एप्रिल रोजी नाशिक येथील कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे.

Recent Posts