महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्हा भाजप मध्ये काळानुसार आणि गरजेनुसार नेते मंडळीना कार्यक्रमात आणि कार्यक्रमाच्या बॅनर वर जागा मिळते असे चित्र लातूर भाजप मध्ये दिसून येत आहे. सध्या राज्यात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकिचे वारे चालू आहे, या निवडणुकीच्या निमित्ताने लातूर भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी आपल्या माजी आमदार,
खासदार यांची आठवण झाली आणि या नेत्याना कार्यक्रमात पहिल्या रांगेत, स्टेज वर आणि बॅनरवर स्थान दिले. मागील काही काळा पासून लातूरचे माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर आणि माजी मंत्री विनायकराव पाटील या नेते मंडळीना लातूर भाजप विसरली की काय ? असे चित्र दिसत होते. या नेते मंडळीतील माजी खासदार डॉ. सुनील
गायकवाड यांनी तर भाजप च्या पडत्या काळापासून पक्ष निष्ठा जपली आणि पक्षाशी इमानदार राहिले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. सुनील गायकवाड यांना लातूर भाजप च्या प्रमुख असलेल्या नेत्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि आपल्याला वरचढ होऊ नये म्हणून डॉ. सुनील गायकवाड यांना तिकीट मिळू नये अशी वेवस्था केली अशी जिल्ह्यात चर्चा होती आणि आहे.
आणि लातूर जिल्ह्या एक उच्यशिक्षित, सुसंस्कृत खासदारा पासून वंचित राहिला, लातूर भाजपाने माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या बाबतीत पण अशीच काहीतरी भावना ठेवले आहे. लातूर भाजपा मध्ये सर्वात अभ्यासू, अनूभवी आणि आक्रमक अशी ओळख असलेले नेते म्हणजे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर आहेत. यांच्या हि बाबतीत लातूर भाजपा गरजेनुसार
त्यांना मान, सन्मान आणि कार्यक्रमाच्या बॅनरवर आणि कार्यक्रमात जागा देते, लातूर भाजपच्या या अंतर्गत गटबाजी मुळे भाजपाचे नुकसान होत आहे. आणि यांचा फायदा लातूर काँग्रेस पक्षाला म्हणजे देशमुख परिवाराला होतो. हि बाब भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख आणि देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू असलेले आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या लक्षात येईल का असा प्रश्न लातूर जिल्ह्यातील भाजपावर प्रेम करणारे आणि भाजपा मधील कार्यकर्त्यांना नक्की पडला असेल.