महाराष्ट्र

लातूर जिल्ह्यातील विनापरवानगी, अनधिकृत होर्डिंग बॅनर्स तत्काळ काढून घेवून संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्याच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सूचना

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यातील विनापरवानगी, अनधिकृत होर्डिंग बॅनर्स तत्काळ काढून घेवून संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूर शहर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना दिल्या

आहेत. लातूर जिल्ह्याचा कारभार जिल्हाधिकारी म्हणून स्वीकारल्यापासून जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यप्रणालीत कमालीचा बदल सामान्य माणसाला दिसून येत आहे. त्या मुळे जिल्ह्यातील नागरिक जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्या कार्याचे आणी त्यांचे कौतुक करत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे

यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी होती जिल्ह्यातील मतदानाचे प्रमाण वाढवे म्हणून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्या नेतृत्वात आणी मार्गदर्शनात विवीध उपक्रम राबवून मतदानाचे प्रमाण वाढवले आणी जिल्ह्याला एक सक्षम आणी कर्तव्यदक्ष महिला जिल्हाधिकारी मिळाली आहे हे दाखवून दिले आणी ते लोकांना दिसलही,

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्या कर्तव्यदाक्षतेचा अनुभव परत एकदा दिसून आला आहे, मुंबई येथील घाटकोपर येथे जाहिरात फलक कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील विनापरवानगी, अनधिकृत होर्डिंग बॅनर्स तत्काळ काढून घेवून संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्याच्या सूचना

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूर शहर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना दिल्या आहेत. महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील विनापरवानगी लावण्यात आलेले अनधिकृत होर्डिंग बॅनर्स तत्काळ काढून घेवून संबंधितांवर

नियमानुसार कठोर कार्यवाही करावी. अवाजवी आकाराचे होर्डिंग बॅनर्स लावण्यास परवानगी देवू नये. होर्डिंग बॅनर्स लावण्यासाठी असलेल्या होर्डिंगची रचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडीट) करण्यात यावी. अवकाळी पाऊस, वादळाच्या काळात जाहिरात फलकामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.

तसेच अशा प्रसंगी जाहिरात फलकाच्या आजूबाजूला न थांबण्याबाबत नागरिकांना सूचना देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Most Popular

To Top