पोलीस

न्यायालयाने आदेश दिल्याने गांधी चौक पोलीसांनी परस्पर गाडी विक्री करणाऱ्या तिघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखला केला

महाराष्ट्र खाकी (लातूर) – सचिन देविदास पवार (रा. हडोळती) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांनी MH 24 ADW 1634 ही स्विफ्ट डिझायर कार शोरुम मधून खरेदी केलेली होती. केवळ 3 हजार किलोमिटर चाललेली ही कार 30 जून 2020 रोजी अपघातग्रस्त झाली. त्यामुळे शोरुममध्ये ती दुरुस्तीसाठी लावण्यात आली. ती गाडी पूर्ण स्क्रॅप झाली आहे असे

सांगून तक्रारदाराकडून आरसीबुक, विमा, आधार कार्ड अशी कागदपत्रे शोरुमच्यावतीने जमा करून घेण्यात आली. तक्रारदाराकडून राहिलेल्या रक्कमेचे हप्ते भरुन घेण्यात आले. परंतु, शोरुमचे व्यवस्थापक, एजंट यांनी संगनमताने त्या वाहनाची परस्पर विक्री केली. त्यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे गुणवंत रामदास फावडे, नामदेव बाबुराव उगीले आणि सादीक इब्राहिम

सय्यद यांनी फसवणूक केली म्हणून तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी कारवाई केली नाही उलट न्यायालयात दाद मागण्यास सांगितले. तक्रारदाराने न्यायालयात दाद मागितली. वाहनाची विक्री केलेली नाही, परस्पर वाहन विक्री करून तक्रारदाराची फसवणूक केली म्हणून दिलेल्या तक्रारीवरुन तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

To Top