लातूर पोलिसातर्फे आयोजित “एकता दौड” उत्सहात संपन्न, 1500 जणांचा उत्स्फूर्त सहभाग

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. त्यातच अमृत महोत्सवी वर्षा निमित्त लातूर पोलीस दला तर्फे आज रविवारी ( दि. 14 ऑगस्ट ) सकाळी एकता दौड चे आयोजन करण्यात आले होते. एकता दौडला नागरिकांनीही उस्फुर्त प्रतिसाद दिला. लातूर जिल्हाधिकारी

पृथ्वीराज बी‌.पी. यांनी हिरवा झेंडा दाखवून एकता दौड ला सुरुवात केली.सकाळी सातच्या सुमारास यशवंत विद्यालयाच्या मैदानावर लातूर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अलमदार तसेच नागरिक असे एकूण 1500 जणांचा सहभाग होता . त्यात पोलीस ट्रेनिंग स्कूल, बाभळगाव, भरतीपूर्व प्रशिक्षण इन्स्टिट्यूट, पोलीस मुख्यालय, दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृति

दल,जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच इतर नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. एकता दौंड मध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांना पोलीस दलातर्फे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी देशभक्तिपर गीते वाजविली जात होती,तर ठिकठिकाणी नागरिक टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करत होते. तर यावेळी

विविध सेवाभावी संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते स्पर्धकांना लिंबू पाणी देऊन उत्साह वाढवित होते. लातूर जिल्हा पोलिस दलातर्फे आयोजित एकता दौड मध्ये पोलिसा सोबतच मोठ्या संख्येने लातूरकर ही सहभागी होऊन धावले.पुरुष, महिलांबरोबर लहान मुलेही एकता दौड मध्ये सहभागी झाली होती. एकता दौडचा यशवंत विद्यालयाच्या मैदानावर समारोप झाला. दहा किलोमीटर

दौड मध्ये म्हाडा कॉलनीत राहणारी अकरा वर्षाची चिमुकली सानिया फिराेज पटेल ने प्रथम क्रमांक पटकाविला. तर पुरुष गटात पोलिस अमलदार सागर रामदास पाडळे,(शीघ्र कृती दल), सोमनाथ एकनाथ डंबाळे, (शीघ्र कृती दल), तानाजी व्यंकटराव पाटील पोलीस उपनिरीक्षक (लातूर ग्रामिण) यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. हि एकता दौड

यशस्वी होण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार बिर्ला, पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, आवेज काझी व त्यांच्या टीमने वाहतुकीचे योग्य नियमन केल्याने कुठल्याही अडथळ्यांविना, वाहतुकीची समस्या न उद्भवता एकता दौड पार पडली.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे