विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमीत्त IMA लातूर, निमा, इंडीयन डेंटल, होमीओेपॅथी असोशिएशन आणि विलासराव देशमुख फांऊडेशन यांचा संयुक्त महाआरोग्य शिबीर

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमीत्त त्यांच्या जनसेवेचा वसा पूढे कायम चालू ठेऊन त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पन करण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी इंडीयन मेडीकल असोशिएशन, लातूर, निमा, इंडीयन डेंटल, होमीओेपॅथी असोशिएशन आणि

विलासराव देशमुख फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबीर रवीवार दि. 14 ऑगष्ट 2022 रोजी लातूर शहर व परीसरात जवळपास 306 रूग्णालयात महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा लातूर शहर आणि परीसरातील जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे

माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे. सर्वसामान्यांचा सर्वांगीन विकास हा विकासाचा मुलमंत्र घेऊन राजकीय कारकीर्द गाजविणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रियमंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांनी सर्वसामान्य जनतेला सहजगत्या सर्व प्रकारच्या सोयीसुवीधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. यातून लातूर जिल्हयात शिक्षण,

कृषी, सहकार, आरोग्य या क्षेत्रात अनेक पॅटर्न निर्माण झाले. लातूरला शिक्षण, आरोग्य तसेच औद्योगिक केंद्र म्हणून नावारूपास आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून सामाजिक कार्यातून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या स्मृतिदिनी इंडीयन मेडीकल असोशिएशन, लातूर, निमा, इंडीयन डेंटल, होमीओेपॅथी असोशिएशन आणि

विलासराव देशमुख फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबीर सन 2014 पासून सातत्यांने आयोजित करण्यात येत आहे. एकाच दिवशी 300 पेक्षा अधिक रूग्णालयात सर्वसामान्यासाठी मोफत आणि सवतलीच्या दरात आरोग्यसेवा देणारा हा देशातील ऐकमेव उपक्रम ठरतो आहे. यावर्षीही इंडीयन मेडीकल असोशिएशन लातूर, अध्यक्ष डॉ.कल्याण बरमदे, सचिव

डॉ. मुकूंद भिसे, निमाचे डॉ. दयानंद मोटेगावकर, इंडीयन डेंटल डॉ.धनराज शितोळे, होमीओेपॅथी असोशिएशन डॉ. पुरूषोत्तम दरक या संघटनाचे सर्व पदाधिकारी त्याच बरोबर डॉ. अशोक पोददार, डॉ. अजय जाधव, डॉ. किणीकर, डॉ. संजय पौळ, डॉ.दिनेश नवगिरे यांच्यासह शहरातील वरीष्ठ डॉक्टर मंडळी हे सदरील महाआरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेत आहेत.

विलासराव देशमुख फांऊडेशनच्या वतीने त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्यात येत आहे. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून या महाआरोग्य शिबीरात आयएमएचे, दंतवैदयकीय, आर्युवेदीक, होमियोपॅथीक असे एकूण 300 रूग्णालये सहभागी झाले आहेत. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून स्त्री रूग्णालय, लातूर, ग्रामिण रूग्णालय बाभळगाव, ग्रामिण रूग्णालय मुरूड, ग्रामिण रूग्णालय

रेणापूर येथे स्त्रियांचे कर्करोग निदान व उपचार असे जवळपास 300 पेक्षा अधिक रूग्णांलयात लातूर शहर व परीसरात मोफत तपसणी होणार आहे. या निमीत्ताने हजारोंच्या संख्येने तज्ञ डॉक्टर रूग्ण सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. या ठिकाणी प्रयोग शाळेतील तसेच अद्यावत तंत्रज्ञानाच्या काही तपासणी मोफत तर काही तपासणी व उपचार सवलतीच्या दरात होणार आहेत. दुर्धर

आजार असलेल्या सामान्य परिस्थितीत असलेल्या रूगणांना फायदा होणार आहे. या महाआरोग्य शिबीराचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी केले आहे.

श्रेष्ठदान अवयवदान
सद्य परिस्थितीत अवयवदानाला आलेले महत्व आणि गरज लक्षात घेऊन आदरणीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यार्थ यावर्षी पासून इंडीयन मेडीकल असोशिएशन, लातूर, निमा, इंडीयन डेंटल, होमीओेपॅथी असोशिएशन आणि विलासराव देशमुख फांऊडेशन यांच्या संयुक्त विदयमाने अवयवदान संकल्प मोहीमेचा शुभारंभ होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या सोयीसुवीधा लातूरमध्ये उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जातील असेही राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी सांगितले आहे.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे