महाराष्ट्र

लातूरचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डॉ.धर्मवीर भारती यांना आदर्श उद्योजक महाराष्ट्र शासन पुरस्कृत शाहू प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – देशात आणि राज्यात लातूरच्या नागरिकांनी प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे आणि आपल्या कार्यातून आणि कर्तृत्वातून लातूरचे नाव मोठे केले आहे. लातूर जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील सर्वात मोठे नाव असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ.धर्मवीर भारती यांना आदर्श उद्योजक महाराष्ट्र शासन

पुरस्कृत शाहू प्रेरणा पुरस्काराने कोल्हापूर येथे नुकतेच सन्मानित करण्यात आले.राज्याचे माजी मंत्री आ.विनय कोरे, राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोश मंडळाचे सदस्य तथा कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आंतर राष्ट्रीय योग सदरुरू डॉ.कृष्णदेव गिरी, महंत सुंदर गिरी महाराज यांच्या शभ हस्ते हा परस्कार डॉ.

धर्मवीर गिरी महाराज यांच्या शुभ ह्स्ते हा परस्कार डॉ धर्मवीर भारती यांना शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे उद्योग क्षेत्रातील भरीव कामगिरी बद्दल हा पुरस्कार नुकताच प्रधान करण्यात आला. या समारंभात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विविध मान्यवरांनाही या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वी उद्योजक म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल धर्मवीर भारती यांचे मित्र परिवाराच्या वतीने कौतुक आणि अभिनंदन होत आहे

Most Popular

To Top