पोलीस

उदगीर तालुल्यात दोन बोगस डॉक्टराविरुद्ध गुन्हा तर तिन बोगस डॉक्टरांना नोटीस

महाराष्ट्र खाकी (उदगीर / प्रतिनिधी) – लातूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टराविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. या संदर्भात उदगीर तहसील कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार आजादी का अमृत महोत्सवनिमित्त उदगीर तालुक्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम राबवण्यासाठी उदगीर येथील तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली कार्यवाही कृती समितीची बैठक 4 ऑगस्टरोजी तहसील कार्यालय येथे घेण्यात आली हाेती. बैठकीत उदगीर तालुक्यातील

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर 7 आणि 8 ऑगस्टरोजी बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले. या पथकाने हंडरगुळी येथील दोन, गुडसूर येथील एक, शिरोळ येथील एक आणि दावणगांव येथे कारवाईसाठी पथक धडकले. दरम्यान, बोगस डॉक्टरांच्या दवाखान्याला भेट देऊन शिरोळ आणि

गुडसूर येथील डॉक्टराविरुद्ध उदगीर ग्रामीण आणि वाढवणा पाेलीस ठाण्यात थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हंडरगुळी येथील दाेघे आणि दावणगाव येथील एका बोगस डॉक्टरांच्या दवाखान्याला पथकाने भेट दिली. मात्र, हे दवाखाने बंद असल्याचे आढळून आले. या दवाखान्याच्या प्रमाणपत्र पडताळणीबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. असे नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर यांनी सांगितले.

उदगीर प्रमाणे पूर्ण लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम राबवली तर अनेक बोगस डॉक्टर मिळतील, खास करून देवणी आणि जळकोट तालुक्यात बोगस डॉक्टरांचे प्रमाण जास्त आहे. या गोष्टीकडे जिल्हाधिकारी, जिल्हा शक्यचिकित्स्क, जिल्हा आरोग्यअधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी लक्ष देऊन कारवाई करतील ही अपेक्षा नागरिक करत आहेत. बोगस डॉक्टर यांच्या विरुद्ध कुठे तक्रार करायची याबद्दल जिल्ह्यात माहीती मिळाली तर प्रशासनाला अधीक मदत होईल!

Most Popular

To Top