महाराष्ट्र

अमित देशमुख यांच्या सत्याग्रह आंदोलनाचा अजित पाटील कव्हेकर आणि प्रेरणा होनराव यांनी केला निषेध

महाराष्ट्र खाकी (लातूर ) – लातूर काँग्रेस कमिटीने माजी मंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या विरोधात लातूर येथील मुख्यबाजारपेठ असलेल्या गंजगोलाई येथील देवीच्या मंदिरा मुख्या द्वारासमोर सत्याग्रह आंदोलन केले. या आंदोलनावर भाजप युवा मोर्च्याच्या प्रदेश सचिव आणि लातूर जिल्हा अध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी सोशल मीडिया वर पोस्ट करत आंदोलनावर टिका केली आहे.

सोनिया गांधी यांची ED चौकशी होत असल्याने देशभरात काँग्रेस कडून आंदोलन होत आहेत. तसेच आंदोलन अमित देशमुख यांच्या नेतृत्वात लातूर मध्येहि झाले. पण हे आंदोलन ज्या ठिकाणी झाले त्यामुळे गंजगोलाई येथील जगदंबा देवीचे द्वार बंद करून आंदोलन केले असा आरोप आणि निषेध भाजप युवा मोर्च्याच्या प्रेरणा होनराव आणि अजित पाटील कव्हेकर यांनी केला आहे.

प्रेरणा होनराव

लातूर कॉंग्रेसचा जाहीर निषेध!!

आजपर्यंत कोणी केलं नाही ते या नास्तिक व हिंदुद्रोही लोकांनी करूनही दाखवल! असं दुसऱ्या धर्माच प्रार्थना स्थळ यांनी बंद पाडलं असतं का? लातूरचे वैभव आई गंजगोलाईचे मुख्यद्वार बंद करुन तिथे राजकीय स्टेज उभा करुन, माजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत यांनी सत्याग्रह आंदोलन केलं आहे. आई कडे पाठ करून,तिच्या मंदीराचे प्रवेशव्दार बंद करून आंदोलन करण्याची दुर्बुद्धि म्हणजे येणाऱ्या काळात नक्कीच ह्रासाच्या दिशेने वाटचाल आहे.
“विनाशकाले विपरीत बुद्धी”
#निषेधच

अजित पाटील कव्हेकर

“विनाश काले विपरीत बुद्धि”

चाणक्य यांचे हे वाक्य कांग्रेसला तंतोतंत जुळत आहे, विनाश जवळ आली की पुढे काय चालू आहे, आपण काय करतोय हे समजत नाही. लातूरचे वैभव, लातूरकरांची आस्था गोलाई आंबाबाई चे मंदिर, आज पर्यंत कोणी असे केले नाही की आईचे दार झाकून आपल्या अल्पविचारी राजकीय स्वार्थासाठी स्टेज देऊन राजकीय कार्यक्रम केला. परंतु या स्वार्थी कांग्रेसवाल्यांनी हे आज केले आहे. याचा आम्ही निषेध करतो. या कांग्रेसवाल्यांना लातूरच्या वैभवापेक्षा कांग्रेस पक्षाच मोठा वाटतो आहे.

जाहीर निषेध !

Most Popular

To Top