आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वात किल्लारी साखर कारखाना सुरु होणार, शेतकरी सभासदांचा सक्षम नेतृत्वार विश्वास

महाराष्ट्र खाकी (औसा / विवेक जगताप ) – देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असलेले आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वात लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा आली, आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिसून आपल्या कार्याची सुरुवात केली. औसा मतदारसंघातील विकास कामाचे कौतुक देश पातळीवर झाले आणि होत आहे.

आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन किल्लारी सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी सभासदांनी अभिमन्यू पवार यांच्याकडे मागणी केली. लातूर व धाराशिव जिल्ह्यातील  चार तालुक्याच्या 252 गावातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या आर्थिक समृद्धीच्या अनुषंगाने उभारण्यात आलेला किल्लारी सहकारी साखर कारखाना बंद असल्याने 22 हजार सभासदांचा ऊसाचा

प्रश्न ऐरणीवर आला होता . मागील काही वर्षापासून किल्लारी साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी प्रयत्नशील असलेले आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर हा कारखाना सुरू करण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार हे सक्षम असल्याच्या अपेक्षेने औसा विधानसभा मतदारसंघातील 124 ग्रामपंचायतीकडून एका शिष्टमंडळाने 21 जुलै रोजी

त्यांची भेट घेऊन संबंधित ग्रामपंचायतीचे ठराव किल्लारी कारखाना सुरू करण्याच्या अनुषंगाने दिले. शेतकर्‍यांच्या या विश्वासापोटी आ. अभिमन्यू पवार यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत 124 ग्रामपंचायतींनी कारखाना सुरू करण्याबाबत मंजूर केलेले ठराव त्यांच्याकडे सुपूर्द केले.व शेतकर्‍यांची किल्लारी कारखाना सुरू करण्याबाबत

असलेली भूमिका मांडत हा कारखाना सुरू व्हावा ही विनंती केली. आमदार अभिमन्यू पवार यांच्या विनंतीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवत यासंदर्भात लवकरच एक बैठक घेऊन त्या बैठकीत योग्य निर्णय घेऊ असा शब्द दिला आहे.124 ग्रामपंचायतीच्या ठरावानंतर लगेच याबाबत पाठपुराव्यासाठी आमदार अभिमन्यू पवार

यांच्याकडून होत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या भेटीदरम्यान भाजपचे लातूर जिल्हाध्यक्ष आमदार रमेशअप्पा कराड, उमरगा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले, माजी मंत्री विनायकराव पाटील आदी उपस्थित होते.

Recent Posts