पोलीस

लातूर जिल्ह्यातला मटका बंद मग मुख्य बस स्टॅन्ड मागील गांधी मार्केट मधील मटका चालकांवर कोणाचा आशीर्वाद ?

महाराष्ट्र खाकी (लातूर / प्रतिनिधी) – लातूर शहरात आणि जिल्ह्यातील अवैध्य धंदे कमी करण्यात लातूर पोलिसांना चांगल्या प्रकारे यश आले आहे असे म्हणावे लागेल. करण जिल्ह्यात आणि शहरात मटका कमी झाला आहे. पण याला छेद देणारी घटना सध्या लातूर शहरातील मुख्या बस स्टॅन्ड च्या मगे गांधी मार्केट मध्ये बिनधास्त चालू आहे. लातूर मनपा कडून व्यपाऱ्यांसाठी बस स्टॅन्ड च्या मगे हे

व्यापारी संकुल बांधले आहे. आता याच मार्केट मध्ये पार्किंग मध्ये मटका जोरात सुरु आहे. बिनधास्त टेबल टाकून चिट्ठी मटका चालू आहे असे चित्र सध्या दिसून येत आहे. आता प्रश्न असा आहे की हा मटका कोणाचा आणि कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे? गांधी चौक पोलीस स्टेशन यांच्या निदर्शनास का आला नाही ? गांधी चौक पोलीस स्टेशन कडून या मटका चालकावर कारवाई कधी

होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस मटक्याबद्दल चांगलेच कडक कारवाई करत असताना गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीत हा मटका कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे ? या मटका चालकावर लवकरच कारवाई होईल अशी अपेक्षा नागरिक आणि व्यापारी करत आहेत.

Most Popular

To Top