महाराष्ट्र

लातूर रेल्वे स्टेशनवर पिट लाईनची तातडीने उभारणी करण्यात यावी खासदार सुधाकर शृंगारे यांची लोकसभेत मागणी 

महाराष्ट्र खाकी ( लातूर/ प्रतिनिधी ) – लातूर रेल्वे स्टेशनवर पिट लाईनची तातडीने उभारणी करण्यात यावी अशी मागणी लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी लोकसभेत केली आहे . लातूर रेल्वे स्टेशनवर पिट लाईनची व्यवस्था नसल्याने नवीन रेल्वे गाड्या सुरुवात करणे आणि प्रवाश्याना सेवा सुविधा देण्यात अडचणीत येत आहेत . त्यामुळे तातडीने पिट लाईनच्या उभारणीला मान्यता

द्यावी ,याकडे खा . शृंगारे  यांनी सभागृहाचे लक्ष वेधले आहे . लातूर रेल्वे स्टेशनवरून जेव्हा जेंव्हा  नवीन गाडी सुरु करण्याची मागणी करण्यात येते तेंव्हा   स्टेशनवर आवश्यक त्या सुविधा नसल्याचे कारण सांगण्यात येते ,त्यामुळे अनेक वर्षांपासून काही नवीन मागणी करण्यात येणाऱ्या रेल्वे गाड्या सुरुवात झालेल्या नाहीत , लातूरला आता मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी झालेली

आहे . त्याच  बरोबर लातूर रेल्वे स्टेशनवरून ये-जा करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे . सामान  आणि माल  वाहतूकही  वाढलेली आहे . विशेष म्हणजे लातूरसह मराठवाड्यातील जनतेला देशाच्या विविध शहरांशी जोडण्या संबंधाने नवीन रेल्वे गाड्या सुरुवात होणे गरजेचे आहे . हेही खासदार सुधाकर शृंगारे  यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले आहे .

लोकसभेत बोलताना खासदारांनी नियम – 377 अंतर्गत पिट लाईनचा मुद्दा उपस्थित करून  लातूर रेल्वे स्टेशनवर  पिट लाईन उभारण्यासाठी आवश्यक  निधीची तरतूद करून काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी केली आहे . लातूर रेल्वे स्टेशनवर पिट लाईन झाल्यास मराठवाड्याला जोडणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या सुरुवात करणे शक्य होणार असून प्रवाश्यांनाही  जास्तीत

जास्त सुविधा देणे शक्य होणार आहे . मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीची  123 वी  बैठक नुकतीच मुंबईत आयोजित करण्यात आली होती , या बैठकीतही पिट लाईन आणि इतर प्रवासी  सुविधा देण्या बाबत महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी अनुकलता दर्शविल्याचे सल्लागार समितीचे सदस्य श्यामसुंदर मानधना यांनी कळवले आहे .

Most Popular

To Top