महाराष्ट्र

निलंगा तालुक्यातील निटुर ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यातून गटारीचे गहाण पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यातील निटूर गावातील प्रभाग दोन मधील भागात सार्जनिक टाकीव्दारे पाणी नळाला येत असते माञ,प्रभाग दोन मधील कांही घराच्या पिण्याच्या पाण्यामध्येट गटारीचे पाणी मिक्स होत असल्याने आरोग्यावर परिणाम होत असल्याचे पाणी ग्राहक सांगत आहेत याकडे तात्काळ ग्रामपंचायत कार्यालयाच्या संबंधितांनी लक्ष देवून हा गंभीर

प्रश्न मिटवणे आवश्यक आहे. सद्यस्थितीला खरीप हंगामातील पावसाळा संततधार होता त्यामुळे गावातील नाल्या तुटूंब अवस्थेत भारल्या आहेत कारण,प्रभाग दोन मधील बाजार चौकातील सदानंद मठाच्या अलिकडिल भागात रहिवाशी असलेले धोंडीराम नागभूगे व प्रशांत साळुंके यांच्या नळाव्दारे येणार्‍या पिण्याच्या पाण्यात गाळमिश्रित गटारीतील पाणी मिक्स होत आहे याकडे

कसलेही लक्ष ग्रामपंचायतीचे नाही म्हणून तात्काळ यावर उपाययोजना करून अनेकांच्या घरात गटारीचे पाणी जात आहे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे.अनेकदा ग्रामपंचायतीला सूचना करूनही कुणीही त्यास दुजोरा देत नाही याकडे प्रशासनाने लक्ष देवून तोडगा काढणे गरजेचे आसे असे मत धोंडीराम नागभूजंगे,प्रशांत साळुंके यांनी म्हटले आहे.

प्रभाग दोनमधील सदानंद मठाच्या अलिकडील बाजूस गटारी आहे माञ ह्या गटारीमुळे कोळ्ळी गल्लीकडे गटारीतील पाणी रस्त्यावरून प्रवाहीत होताना स्पष्ट दिसत आहे आणि पाणी थेट येथील रहिवाशी प्रशांत साळुंके यांच्या पिण्याच्या पाण्यात गटारीतील गहाण मिश्रित पाणी मिक्स होऊन नळाव्दारे पाणी येत आहे पाणी गहाण पध्दतीचे असल्याने या पाण्यामुळे आरोग्यावर परिणाम

करणारा प्रकार घङत असल्याचे प्रशांत साळुंके यांनी सांगितले आहे. एकंदर,ग्रामपंचायत कार्यालय असून खोळंबा अन नसून वळींबा हाच प्रकार सद्यस्थितीला पाहावयास मिळत आहे म्हणून तात्काळ गटारी काढून पिण्याजोगे पाणी तरी मिळावे अशी मागणी प्रभागातील नागरिकांची आहे.

Most Popular

To Top