महाराष्ट्र

प्रेरणा होनराव यांची या वर्षाच्या महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवासाठी महिला अध्यक्ष पदी निवड

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप  ) – प्रेरणा होनराव यांची 2024 या वर्षाच्या महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवासाठी महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे लातूर मध्ये महात्मा बसवेश्वर जयंती उत्सहात आणी विवीध सामाजिक उपक्रम राबवून साजरी केली जाते, या जयंतीच्या महिला अध्यक्ष पदी प्रेरणा

होनराव यांची निवड करण्यात आली, प्रेरणा होनराव या राजकारणासाह सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. लातूर भाजपा मधील तरुण आणी तडफदार नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात, आपल्या नेतृत्व आणी भाषण शैलीमुळे त्यांनी लातूर जिल्ह्यातील आणी शहरातील अनेक समस्यावर आवाज उठवत सामान्य

जनतेला न्याय मिळवून दिला आहे. आपल्या अभ्यासू आणी हजरजबाबी वृत्ती मुळे महाराष्ट्र भाजपाने त्यांना राज्य प्रवक्ता पदाची जबाबदारी सोपवली आहे आणी प्रेरणा होनराव यांनी ही जबाबदारी अधीक प्रभावीपणे निभावत आहेत. या सर्व गोष्टी सोबत प्रेरणा होनराव यांनी लिंगायत समाजासाठी वेळोवेळी आवाज उठवत

समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कमी वयात आणी एक महिला असून त्यांनी राजकारणात, समाजकारणात आणी महाराष्ट्र भाजपात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रेरणा होनराव यांची महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवासाठी महिला अध्यक्ष पदी निवड झाल्याने समाजातील तरुण आणी खासकरून महिलांना

नक्कीच उत्साह निर्माण झाला आहे आणी या वर्षीच्या जयंती मध्ये अनोखे उपक्रम राबवून महात्मा बसवेश्वर जयंती उत्साह साजरी होणार आहे. या निवडीबद्दल प्रेरणा होनराव यांनी पोस्ट करून समाजाचे आभार मानले आहेत.

https://www.facebook.com/share/p/v3EUzkdoqLuG53sw/?mibextid=qi2Omg

Most Popular

To Top