संजय राऊत यांच्या पाठोपाठ अमित देशमुखांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता खरमरीत टिका

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप  ) – महाराष्ट्रात जे जे उपमुख्यमंत्री झाले ते कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणी जे म्हणतात कि मी पुन्हा येईन पण ते पुन्हा येत नाहीत अशी टिका अमित देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता केली, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले,

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागेवर मी जाईन, असेही त्यांना वाटत होते, असे वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी केले. त्यांच्या या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळेच त्यांचे पंख छाटून त्यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले, असा आरोप (टिका ) संजय राऊत यांनी केला आहे तर

लातूर शहरचे आमदार आणी माजी मंत्री अमित देशमुख यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टिका केली आहे. अमित देशमुख लातूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्या हाडोळती येथील प्रचारसभेत सभेत बोलत असताना म्हणाले कि महाराष्ट्रात जे जे उपमुख्यमंत्री झाले

ते कधी मुख्यमंत्री झाले नाहीत आणी म्हणतात मी पुन्हा येईन पण ते पुन्हा येत नाहीत अशी टिका आमदार माजी मंत्री अमित देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या नंतर केली आहे. संजय राऊत यांच्या टिकेला नितेश राणे यांनी जशास तसे

उत्तर दिले आहे पण अमित देशमुख यांच्या टिकेला भाजपा कडून कोणीही प्रतिउत्तर दिले नाही. विशेष करून लातूर भाजपातील नेते काही माहिती नसल्यासारखे शांत आहेत, फडणवीसांचे जवळचे आणी लाडके आमदार अभिमन्यू पवार हे देखील शांत आहेत बहुतेक आमदार अमित देशमुख यांच्या 2019 च्या विधानसभेत केलेल्या मदती मुळे अभिमन्यू पवार शांत आहेत अशी चर्चा चालू आहे.

Recent Posts