महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुके ) – निलंगा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर हे सातत्याने मतदारसंघाच्या विकासासाठी विविध माध्यमातून केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत असतात. या पाठपुराव्यातूनच निलंगा शहरातील रस्ते विकासासाठी निलंगा नगरपालिकेस 3 कोटी रूपये तर शिरूर अनंतपाळ नगरपंचायतच्या
माध्यमातून शहरातील विविध विकास कामासाठी 2 कोटी रूपेयांच्या निधीस मंजुरी प्राप्त झालेली आहे. सदर निधीस मंजुरी दिल्याबददल माजीमंत्री आ.निलंगेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहेत. सदर निधी मंजुर झाल्याने माजीमंत्री आ.निलंगेकर यांच्या नेतृत्वात विकास पर्वास प्रारंभ झाले असल्याचे सर्व सामान्यांकडुन बोलले जात
आहे. गत अडीच वर्षा सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने फक्त बांद्रा आणि बारामतीच्या विकासाला प्राधान्य दिले असल्याचे पाहण्यास मिळाले होते. विशेषत: मराठवाडयाच्या विकासाकडे या सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याची भावना जनतेकडुन सातत्याने व्यक्त होत होती. अखेर या तीन पक्षातील कलहामुळे या सरकारला पायउतार व्हावे लागले. आणि
राज्यात पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या हिताचे आणि चौफेर विकासाचे सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झाले. नवीन सरकार स्थापन होताच माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी मतदारसंघासह जिल्हयाच्या विकासाला पुन्हा एकदा चालना मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू केलेला आहे. या पाठपुराव्यामुळे निलंगा शहरातील रस्ते
विकासासाठी राज्य सरकारच्या वतीने नगरपालिकेस 3 कोटी रूपयांचा निधी मंजूर केलेला आहे. त्याचबरोबर शिरूर अनंतपाळ शहरातील विविध विकास कामांसाठी नगरपंचायतीला 2 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. निलंगा आणि शिरूर अनंतपाळ पालिका क्षेत्रात लवकरच या माध्यमातून विकास कामांना सुरूवात होणार आहे. सदर निधी मंजूर केल्याबददल माजीमंत्री
आ.निलंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहेत. आगामी काळातही माजीमंत्री आ.निलंगेकर यांच्यामाध्यमातून निलंगा मतदारसंघासह जिल्हयात विकास कामांचा धडाका सुरू होवून एक नवीन विकास पर्व जिल्हयाच्या इतिहासात नोंदविले जाईल असा विश्वास सर्वसामान्यांकडुन व्यक्त होत आहे.