राजकारण

लातूर शहर व ग्रामीणच्या दोन्ही आमदारांनी गेल्या पाच वर्षामध्ये कुठल्याही विकासाची कामे केलेली नाहीत – अजित पाटील कव्हेकर

महाराष्ट्र खाकी (लातूर / प्रतिनिधी ) – लातूर शहर व ग्रामीणच्या दोन्ही आमदारांनी गेल्या पाच वर्षामध्ये कुठल्याही विकासाची कामे केलेली नाहीत. परंतु आता लातूर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मतासाठी दारोदारी फिरण्याचे काम करीत आहेत. लातूरच्या सत्ताधार्‍यांनी 70 वर्षात कुठलेही काम मार्गी लावलेले

नाही. पंरतु मोदी सरकारने मात्र सर्वसामान्य नागरिक व शेतकर्‍यांचा चौफेर विकास साधण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने चार वर्ष ज्या आमदारांनी लातूरचा उपवास ठेवला तो आमदार लातूर शहरांमध्ये आज पुरीभाजी खात फिरत आहेत ही शोकांतिका आहे. असे टिकास्त्र युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश

उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेेकर यांनी केले. कव्हा रोड भाागातील जिंदल टॉवर येथे भारतीय जनता पार्टी, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट, रिपाई आठवले गट, रासप व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खा.सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ आयोजित मंडळाध्यक्ष व बुथ प्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते.

Most Popular

To Top