महाराष्ट्र

सतीश हानेगावे तगरखेडा यांचा राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने गौरव

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – अत्यंत प्रतिष्ठित अशा सामाजिक व राष्ट्रीय बांधिलकी जोपासत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या काव्य मित्र संस्था पुण्याच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा राष्ट्रीय रुग्णसेवा पुरस्कार, राष्ट्रीय युवा चेतना पुरस्कार, राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार असे पुरस्कार विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व नामांकित कार्यकर्तृत्व असलेल्या महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरील

व्यक्तींना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. आषाढी एकादशी, डॉक्टर्स डे, स्वामी विवेकानंद व महामहीम राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून दि. 10 जुलै रोजी पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ पुणे येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षीचा हा राष्ट्रीय मानाचा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते, कवी, लेखक, निवेदक, वक्ता व प्रवचनकार-

जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे प्रदेश संघटक- सतीश हानेगावे यांना घोषित झाला होता. पुरस्कार प्रसंगी मंचावर वंदनीय श्री बापूराव बन्सी जंजिरे, संजय अडसुळे (सभापती- लोणावळा नगरपालिका शिक्षण मंडळ) संतोष घोलप (प्रसिद्ध युवा सेवाभावी उद्योजक, तळेगाव दाभाडे) भागवत थेटे (कार्यकारी अभियंता- एमईसीबी,

पुणे) सौ.अनुराधा थेटे, माजी मेजर सुर्यकांत शेटगार,रमेश होसुरे यांची उपस्थिती होती. या पुरस्काराबद्दल सतीश हानेगावे यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Most Popular

To Top