महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर शहरातील श्रीनिकेतन सोसायटीमधील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडले. 23 लाख 5 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा ऐवज पळवण्यात आला. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या चोरी प्रकरणी आदित्य शिरीष बंडेवार (रा. श्रीनिकेतन सोसायटी, छत्रपती चौक, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत
नमूद केले आहे की, ते कामानिमित्त आपल्या कुटूंबासह घराला कुलूप लाऊन नळदुर्ग येथे गेले होते. परत घरी आल्यानंतर त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलूप कोंयडा तुटलेला दिसून आला. घरात जाऊन पाहिले असता कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. कपाटातील सोन्या – चांदीचे दागिने, रोख रक्कम दिसून आली नाही. 117.64 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 3 नग
नेकलेस, 10 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 3 अंगठ्या, 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 3 कानातील फुले, 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र एक, 110.5 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 4 नग बांगड्या, 104 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन बिस्कीट, 2 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चेन 1 नग, असे एकूण 414.14 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने प्रति ग्रॅम 4500 रुपये प्रमाणे एकूण 18 लाख रुपयांचे तसेच चांदीचे
फूलपात्र, चांदीची पळी, चांदीच्या वाट्या, निरंजन किंमत 5 हजार रुपये, कपाटातील रोख रक्कम 5 लाख रुपये असा एकूण 23 लाख 5 हजार रुपयांचा ऐवज पळवण्यात आला. विवेकानंद चौक पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत.