महाराष्ट्र

पंढरपूर वारीचा लातूर पॅटर्न 1207 भाविक 25 ट्रव्हल्सद्वारे मोफत पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रशांत साळुंके ) – माझं लातूर आणि ट्रॅव्हल्स व्यावसायिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आषाढी एकादशीनिमित्ताने मोफत पंढरपूर वारीचा उपक्रम राबविण्यात आला. 1147 भाविक प्रवाशी, 60 स्वयंसेवक, 2 रुग्णवाहिका आणि विक्रमी 25 ट्रॅव्हल्सने 1207 जण पंढरपूरकडे रवाना करण्यात आले. माझ लातूर परिवाराचा हा 25 ट्रव्हल्सद्वारे मोफत पंढरपूर

वारीचा लातूर पॅटर्न निर्माण केला. याप्रसंगी लातूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांच्यासह माझं लातूर परिवाराचे डॉ. सदानंद कांबळे, आदित्य भुतडा, शाम तोष्णीवाल, उपक्रमास बिनशर्त सहकार्य करणारे सर्व ट्रॅव्हल्स व्यावसायिक यांची

प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सांगितलेली की पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीत जात असताना संयोजकांनी आणि पोलीस प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचना भाविकांनी पाळाव्यात ज्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही. अधिक गर्दीत जाण्याचे टाळावे. डॉक्टर लक्ष्मण देशमुख व प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय

होय यांनी मनोगत व्यक्त केले व सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. माझं लातूर परिवार आणि ट्रॅव्हल्स व्यवसायिक यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमात 1147 भाविकांना पंढरपूरला दर्शनासाठी पाठवण्यात आले. या सर्व भाविक प्रवाशांच्या सेवेसाठी 60 स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच 2 रुग्णवाहिका, 2 डॉक्टर, 4 नर्सिंग स्टाफ अत्यावश्यक

औषधांसह उपस्थित होता.. सहभागी सर्व भाविकांच्या चहापाणी, फराळ, मास्क आणि सॅनिटायझरची सोय मोफत करण्यात आली. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जुगलकिशोर तोष्णीवाल, सोमनाथ मेदगे, जगदीश स्वामी, शफीक चौधरी, मदन केंद्रे, प्रविण पाटील, वाजीद शेख, नरेश घंटे, योगेश शिंदे, सतिश तांदळे, अभय मिरजकर, काशिनाथ बळवंते, डॉ. सितम सोनवणे, तम्मा पावले,

प्रमोद गुडे, संजय स्वामी, ऍड. प्रदीप मोरे, गोपाळ झंवर, दिपरत्न निलंगेकर, ऍड.राहुल मातोळकर,गोविंद हेड्डा, गणेश हेड्डा, अभिजित पिचारे, मच्छिंद्र आमले, विनोद कांबळे, सचिन अंकुलगे, सचिन सोळुंके,प्रा अजय वाघमारे, भास्कर कुंभार, विष्णू साबदे, सुनिल गवळी, रत्नाकर निलंगेकर,प्रशांत ऊर्फ रामभाऊ साळुंके, एस आर काळे, उमेश कांबळे, अमर करकरे परिश्रम घेतले.

Most Popular

To Top