पोलीस

लातूर LCB पथकाची कारवाई तीन मोटार सायकल चोरट्यांना अटक करून 1 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

महाराष्ट्र खाकी ( विवेक जगताप /लातूर ) – लातूर जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात मागील काही महिन्यात लातूर जिल्ह्यात विवीध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्याची उकल करून गुन्हेगारांना पकडण्यासाठी लातूर LCB च्या पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात एक पथक तयार केले होते. या अनुषंगाने LCB पथकाने तीन

मोटारसायकल चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 3 मोटर सायकल आणि एका मोटर सायकल चे सुटे भाग असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे .या कारवाईमध्ये दोन गुन्हे उघड झाले आहेत. 1) रहीम सुलेमान शेख वय 22 राहणार रेनापुर 2) बालाजी नागनाथ भोळे वय 35 राहणार रेनापुर
3) अमन उर्फ नोमान एजाज पठाण वय 21 राहणार

रेनापुर. या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 3 मोटर सायकल, आणि साहित्य असा एकूण 1 लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या कार्यवाही मध्ये पोलीस स्टेशन रेणापूर येथील  1) गुन्हा नंबर 163 /2022 कलम 379 भा द वि, 2) गुन्हा नंबर 203 /2022 कलम 379 भादवी हे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे ,अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग

जैन , लातूर शहर चे DYSP जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली (LCB) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा लातूरचे सपोनि राहुल बहुरे, सपोनि सचिन द्रोणाचार्य, पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, माधव बिलापटे, नवनाथ हसबे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख ,संतोष खांडेकर ,नकुल पाटील यांच्या पथकाने पार पडली.

Most Popular

To Top