12 वी बोर्ड परीक्षेत श्री त्रिपूरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून उत्तम गुणांची परंपरा कायम

महाराष्ट्र खाकी (लातूर) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावीचा निकाल आज बुधवारी 8 जून 2022 रोजी जाहीर झाला आहे. यावेळी लातूर विभागाने उत्तम कामगिरी केली आहे. लातूर विभागाचा निकाल 95.25 टक्के लागला आहे . लातूर शहरातील तसेच महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले प्रा.उमाकांत होनराव सर यांचे (रिलायन्स लातूर पॅटर्न) श्री त्रिपूरा कनिष्ठ विज्ञान

महाविद्यालयाने आपली उत्तम गुणांची परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयातून या वर्षी 412 विद्यार्थ्यांनी 12 वी बोर्ड परीक्षा दिली होती . यामध्ये कु. जाधव कृतिका सुभाष ही विद्यार्थीनी 95.17% गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम क्रमांकावर आहे, चि. काळसेकर व्यंकटेश आत्माराम हा विद्यार्थी 92.5% गुण घेऊन महाविद्यालयातून द्वितीय, कु. पळसे आर्याली आनंद

व लोखंडे पूनम सुरेश हे विद्यार्थी 91.5% गुण घेऊन तृतीय क्रमांकावर राहिले. महाविद्यालयातून 95% च्या वर 01 विद्यार्थी, 90% च्या वर 06 विद्यार्थी, 85% च्या वर 66 विद्यार्थी, 80% च्या वर 137 विद्यार्थी, 75% च्या वर 120 विद्यार्थी असे एकूण 330 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उर्त्तीर्ण झाले आहेत, महाविद्यालयातील इतर सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उर्त्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयाचा

विषयनिहाय निकाल – जीवशात्र विषयामध्ये मध्ये कु. जाधव कृतिका सुभाष या विद्यार्थिनीने 100 पैकी 100 गुण संपादन केले तर 90 च्या वर गुण घेणारे 52 विद्यार्थी आहेत, रसायनशास्त्र विषयामध्ये 100 पैकी 90 च्या वर गुण घेणारे 43 विद्यार्थी, गणित विषयामध्ये 100 पैकी 90 गुणांच्या वर 26 विद्यार्थी भौतिकशास्त्र विषयामध्ये 100 पैकी 90 च्या वर गुण घेणारे 06 विद्यार्थी आहेत. सर्व

उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले, यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. उमाकांत होनराव सर, संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या सौ. सुलक्षणा केवळराम, कार्यकारी संचालक प्रा. ओंकार होनराव, उपप्राचार्य राजकुमार केदासे, अधीक्षक प्रा श्रीकृष्ण जाधव, प्रा. दीपक होनराव, प्रा. ज्ञानेश्वर पुरी, प्रा. मनोहरराव कबाडे, प्रा. राकेश चौधरी, प्रा. उमेश राठोड, प्रा. रामशंकर यादव,

प्रा. उज्वल कुमार, प्रा. सतीश पाटील, प्रा. प्रसाद कुलकर्णी, प्रा. मीरा मुंडे, प्रा. एम आय शेख, प्रा. मोरे अश्विनी, शिक्षक व शिकेत्तर कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Recent Posts