महाराष्ट्र खाकी ( पुणे ) – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात विधान परिषदेसाठी 20 जून ला निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने 5 उमेदवारांची यादी आज दि. 8 जाहीर केली आहे. या यादीत भाजपच्या घटक पक्षांतील माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना डावलण्यात आले आहे. सदाभाऊ खोत यांना
वगळून उमा खापरे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात विधान परिषदेसाठी 20 जून ला निवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सदाभाऊ खोत यांना वागल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रवक्ते रविकांत वर्पे यांनी सदाभाऊंना ट्विट
करून चांगलाच समाचार घेतला आहे. अहो सदाभाऊ निरोप आला म्हणे… आता विश्रांती घेण्याचा. भाजपासाठी विखारी वक्तव्ये केली गरळ ओकली,आक्रोश केला पण तो काही कामी नाही आला वाटतं! भाऊ हे भाजपावाले घासभर खाऊ घालतात आणि कोस भर चालत नेहतात. भाजपा म्हणजे “काम सरो आणि वैद्य मरो” असे ट्विट केले आहे.