महाराष्ट्र

माझं लातूर परिवाराच्या समाजोपयोगी व दिशादर्शक उपक्रमाची चळवळ पाहून परिवाराच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रशांत साळुंके ) – लातूर जिल्ह्यातील समाजोपयोगी व दिशादर्शक उपक्रमाची चळवळ पाहून माझं लातूर परिवाराचे योगदान दिल्याने राज्यभर चर्चा सध्या चालू आहे . महात्मा फुले शिरोमणी सावता माळी सेवाभावी संस्थेच्या वतीने दि.15 मे रोजी लातूरात राज्यस्तरीय महात्मा फुले समाजरत्न देऊन माझं लातूर पुरस्कार परिवाराला मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात

आले. याप्रसंगी मा.खासदार,कुलगुरू,नगराध्यक्ष,ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.जनार्धन वाघमारे,ज्येष्ठ समाजवादी नेते अॅड.मनोहारराव गोमारे,माजी खा.डाॅ.सुनिल गायकवाड,आ.अभिमन्यू पवार,दत्ता माळी ( चांबरगे ) यांची मंचावर उपस्थिती होती. हा राज्यस्तरीय पुरस्कार परिवारातील प्रत्येक क्रियाशील मान्यवरांना समर्पित आहे.ज्यांची मोलांची साथ,मार्गदर्शन,सहभाग,निस्वार्थ

सेवाभाव वेळोवेळी नव्या जोमाने अविरत सुरू राहील अशी ग्वाही माझं लातूर परिवाराचे प्रमुख सतिश तांदळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी वार्तालाप करत असताना सांगितले आता जबाबदारी वाढत आहे तसेच लातूरकरांच्या आमच्याप्रति विश्वास आणि प्रेमही वृृृध्दिंगत होत आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Most Popular

To Top