महाराष्ट्र

लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप ग्रामीण टी 10 स्पर्धेत बाभळगाव च्या अमीत क्रिकेट क्लबने लातूर ग्रामीण संघावर रोमहर्षक मिळवला विजय

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रशांत साळुंके ) – बाभळगावला क्रिकेट नवी नाही, त्याला क्रिकेट ची पार्श्वभूमी आहे. येथे ग्रामीण टुर्नामेंट व्हायच्या. लहानपणी बाभळगाव व परिसरात क्रिकेट टुर्नामेंट खेळल्या आहेत. त्याच परंपरेला पुढे घेऊन जाण्याचे काम लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप च्या ग्रामीण टी 10 स्पर्धेच्या माध्यमातून करायचे असून सध्या मैदानी खेळही मोबाईल

स्क्रीनवर खेळले जात आहेत. जे कोणी मैदानावर खेळायचे ते कोरोनामुळे बंद झाले, ही सर्व परिस्थिती बदलून सर्वांना पुन्हा मैदानावर खेळण्यास प्रवृत्त करण्यासाठी या स्पर्धेचे विलासराव साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून माननीय दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खेळवली जात आहे. मैदानी खेळ हे जुनं ते सोनं आहे. त्याला चालना

देण्यासाठी ही स्पर्धा ग्रामीण भागात खेळवली जात आहे. मांजरा परिवाराच्या सौजन्याने ही स्पर्धा सुरु केली आहे. यात लातूर जिल्ह्यातून 400 संघ सहभागी झाले आहेत. तालुकास्तरावरील सामने झाल्यानंतर मुख्य सामने टाऊन हाॅल येथे होणार आहेत. प्रत्येक गावातील खेळाडू या क्रीडा स्पर्धेत उतरावे, त्यांना प्रोत्साहन मि्ळावे यासाठी ही टी 10 स्पर्धा सुरु करण्यात आली आहे. लाँग टर्म धोरण

ठेवून ग्रामीण टी 10 स्पर्धेचे हे पहिले पाऊल आपण टाकत आहोत. या स्पर्धेला राज्य स्तरावर घेऊन जायचे आहे. बाभळगाव पासून याची सुरुवात झाली आहे असे सांगून आगामी काळात मांजरा परिवारातील सर्व संस्थानी खेळाडू म्हणून टीम नी सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी केले आहे ते लातूर तालुक्यांतील बाभळगाव येथे आयोजित लोकनेते विलासराव देशमुख चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धेचा लातूर तालुक्याचा शुभारंभ त्यांच्या हस्ते रविवारी दयानंद विद्यालय येथे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते

आगामी काळात क्रीडा क्षेत्राकडे अधिक लक्ष देवू

आमदार धीरज विलासराव देशमुख पुढें बोलताना म्हणाले की ग्रामीण भागातील क्रीडांगणाचा दर्जा यापुढील काळात वाढवायचा आहे. खेळाडूंना सराव करण्यासाठी चांगले सोयी सुविधा असलेले मैदान लागते. ते निर्माण करण्याचा प्रयत्न करु. केवळ क्रिकेटच नाहीतर हाॅलि्बाॅल, बॅडमिंटन, कबड्डी, कुस्ती, खोखो, बाॅक्सिंग असे आऊटडोअर, इनडोअर खेळांना प्रोत्साहन मिळावे, यासाठीही प्रयत्न

करु. मुलींनाही यात समान संधी असेल. या ग्रामीण टी 10 स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लातूर ग्रामीणचे माजी आमदार वैजनाथ शिंदे माजी आमदार अँड त्रिंबक भिसे, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, रेणा साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा संचालक

यशवंतराव चव्हाण, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव,जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख, तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष घोडके,काँग्रेस मीडिया सेल जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी, बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, रेणापूर निराधार योजनेचे अध्यक्ष गोविंद पाटील,जिल्हा बँकेचे संचालक अनुप शेळके, जितेंद्र स्वामी, दगडु पडी ले, लालासाहेब चव्हान,

उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कैलास पाटील, प्रवीण पाटील सचिन दाताळ, रघुनाथ शिंदे, बादल शेख, प्रताप पाटील प्रदीप राठोड पांडुरंग विर बालाजी वाघमारे गोविंद बोराडे, सहदेव मस्के, गोविंद देशमुख, सचिन मस्के, राजेसाहेब सवई संतोष देशमुख यांच्या सहीत ग्रामस्थ, खेळाडू संयोजक सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते

Most Popular

To Top