महाराष्ट्र खाकी (लातूर) – मागील एक – दिड महिन्यापासून लातूर शहराला पिवळ्या आणि गढूळ पाणी पुरवठा झाल्यामुळे अनेक नागरिकांची आरोग्य बिघडले आहे. या समस्सेचे निराकारण करण्यासाठी पालकमंत्री, महापौर आणि मनपा प्रशासनास चांगलीच कसरत करावी लागली आहे. आता या पिवळ्या – गढूळ पाणी पुरवठ्या मुळे नागरिकांचा रोष टाळण्यासाठी पालकमंत्री अमित देशमुख
यांनी औरंगाबादच्या पालकमंत्री सुभाष देसाई यांचा आदर्श घेतील का ? अशी चर्चा लातूर शहरात होत आहे. औरंगाबाद शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत पाणीपट्टीत 50 टक्के कपात करण्याचा निर्णय शुक्रवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थिती झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार प्रशासनातर्फे सोमवारी किंवा मंगळवारी प्रस्ताव प्रशासकांसमोर सादर
केला जाणार आहे. प्रशासकांची सही झाल्यानंतर या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल. शहरातील अनेक भागाला आठ-नऊ दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांचा महापालिकेच्या विरोधात रोष वाढला होता या निर्णयाने नागरिकांचा रोष कमी होईल असे सत्ताधाऱ्यांना विश्वास आहे. लातूर शहरात तर या पेक्षा ही गंभीर परिस्तिथी आहे . एकतर पाणी 8 -10 दिवसांनी मिळते
त्यात पाणी शुद्ध नाही. गढूळ पाणी पिऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात ! मग लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनीही लातूरकरांची पाणी पट्टी कपात (माफ) माफ करतील का ? असा प्रश्न उपस्तित होतो.