महाराष्ट्र

हाडगा येथील अपघातग्रस्त अमोल वाघमारे यांच्या उपचारासाठी ‘ एक हात मदतीचा ‘ चळवळीतील मदतगारांचा सत्कार संपन्न

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यातील हाडगा येथील अपघातग्रस्त अमोल वाघमारे यांच्या उपचारासाठी ज्यांनी मदत केली त्यांचा रूणानुबंध सोहळा घेऊन मदतगारांचा हाडगा ग्रामस्थांच्या वतीने भव्य-दिव्य सत्कार करण्यात आला. हाडगा येथील होतकरू विद्यार्थी अमोल वाघमारे परिक्षा देण्यासाठी निलंगा येथे आवक-जावक करत असताना वाटेत त्याचा

मोठा अपघात झाला.त्याला उपचारासाठी लातूर येथील सह्याद्री हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.अमोल वाघमारे कोमात गेल्याने त्यांच्या उपचारासाठी मोठी रक्कम लागणार होती.मोलमजुरी करून कुटुंबाचा उदयनिर्वाह करणार्‍या अमोल वाघमारे यांच्याकडे उपचारासाठी रक्कम नसल्याची बाब अमोलच्या मिञपरिवाराला कळताच त्यांनी ‘ एक हात मदतीचा ‘ हा

अभियान सुरू करून मोठी रक्कम जमा केली.या दरम्यान काॅंग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी स्वत:हाॅस्पिटलमध्ये जाऊन डिस्चार्ज होईपर्यंत मोठी मदत केली.सर्वांच्या मदतीने अमोल वाघमारे तीन आठवड्यानंतर कोमातून बाहेर आला. त्याच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले.अडचणीत असताना मदत केल्याबद्दल गणपत वाघमारे व हाडगा ग्रामस्थांच्या वतीने

रूणानुबंध सोहळा घेत उपचारासाठी मदत करणारे प्रदेश सचिव अभय साळुंके ,माजी जि.प.अध्यक्ष पंडितराव धुमाळ,शिवसेनेचे तालुकाप्रमुख अविनाश रेशमे,गणेश एखांडे,अमोल वाघमारे यांचा मिञपरिवार यांचा भव्य-दिव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी,माजी पं.स.सदस्य शिवचरण पाटील,कुमार दरेकर,तानाजी डोके,प्रशांत वाघमारे,संदीपान वाघमारे,धनाजी वाघमारे,केदार मोरे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Most Popular

To Top