महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे काॅंग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव अभयदादा साळुंके व ग्रामपंचायत कार्यालयाच्या पुढाकारातून साकारण्यात येत असलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा उभारणी कामाचे उस्तुरी विरक्त मठाचे कोरानेश्वर महास्वामी,बसव पिठावर निलंगा विरक्त मठाचे संगनबसव महास्वामी,शिरूर अनंतपाळ मठ
संस्थानचे शंकरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते नारळ फोडून भुमिपूजन करण्यात आले. इ.स.12 व्या शतकात जगाला शांततेचा संदेश देत जाती व्यवस्थेच्या विरोधात पहिला विद्रोह करणारे जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा पानचिंचोली सारख्या ग्रामीण भागात जेणे करून याठिकाणी लिंगायत समाज बोटावर मोजण्याइतकाच आहे.केवळ बसवण्णांनी घालून दिलेल्या आदर्शावर येणारी
पिठी चालावी हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून पुतळा उभारण्याचे काम प्रदेश सचिव अभयदादा साळुंके यांनी हाती घेऊन दहा लाख रूपये खर्च करून कंपाऊंड,चबुतरा यांचे पुर्ण करून घेतले आहे.पुतळ्यासाठी सर्व जातीधर्मातील नागरिकांकडून 108 रूपये घेऊन त्या सर्वाच्या हाताने इष्टलिंग पूजा करण्याचा संकल्प यावेळी प्रदेश सचिव अभयदादा साळुंके यांनी व्यक्त केला.तर
कोरणेश्वर महाराज म्हणाले,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे मुर्ती नाहीत ते एक विचारधारा आहेत.म्हणून प्रत्येकांनी त्यांचे कार्य आचरणात आणावे असे सांगितले. याप्रसंगी काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश्वर निटूरे, बी.व्ही.मोतीपवळे, काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख अविनाशदादा रेशमे,माजी पं.स.सभापती अजित माने,डाॅ.अरविंद
भातांब्रे,शिवाजी रेशमे गुरूजी,देवणीचे उपनगराध्यक्ष अमित मानकरी,राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष धम्मानंद काळे,युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.आण्णासाहेब मिरगाळे,सरपंच श्रीकांत साळुंके,मधुकर पाटील,सोनू डगवाले,उपसरपंच बब्रुवान जाधव,विक्रम पाटील,आदी जणांची उपस्थिती होती.सूञचालन आयुब शेख यांनी केले तर आभार राजू कत्ते यांनी मानले.