राजकारण

लातूर शहरातील प्रत्येक घरातून एक बाटली पिवळे पाणी घेऊन महानगरपालिकाला देणार- आमदार संभाजी पाटील निलंगेकर

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रशांत साळुंके) – लातूर शहरातील प्रत्येक घरातून नळाव्दारे येणार्‍या पिवळ्या पाण्याच्या बाटल्या घेऊन त्या दि.6 मे रोजी महानगरपालिकेला भेट देणार असून,सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलच्या खाजगीकरणास आमचा विरोध राहील.अगोदर हाॅस्पिटलवर जाऊन नंतर मनपावर पाणी घेऊन जाणार,अशी माहिती माजी पालकमंञी तथा

लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पञकार परिषदेत दिली. भाजपने शहरात ‘ वाचवा ‘ कॅम्पेन सुरू केले आहे.पिण्याच्या पाण्याबाबतीत सध्या गंभीर विषय सुरू आहे.मनपा शुध्द पाणी देऊ शकते.आम्ही 100 कोटी खर्च करून शहरासाठी अमृृत योजना केली.फिल्टर प्लन्ट व्यवस्थित ठेवला असता तर पिवळे पाणी देण्याची नामुष्की ओढावली नसती.गेल्या दीड वर्षांपासून फिल्टर

प्लन्टची देखभालच केली नाही.पालकमंञ्याना शहरात गढूळ पाणी येते हे सुध्दा माहीत नसेल ते विदेशातले पाणी पितात.उजनी धरणाचे पाणी दोन महिन्यांत आणू,असे आश्वासन दिले.पण ते हवेत विरले.एमआयडीसीतील पालकमंञ्यांच्या कंपन्यांना चोवीस तास पाणी दिले जाते,असा आरोप आ.निलंगेकरांनी केला.केंद्राने 2014 साली लातूरला सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल मंजूर

केले.कोविड काळात केंद्राने याच हाॅस्पिटलला निधी दिला.राज्य सरकारने त्यांचा 8 कोटींचा हिस्सा दिला नाही.गोरगरिबांसाठी उभारलेल्या सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलचे खाजगीकरण करू देणार नाही.सरकारातल्या मंडळींच्या कंपन्यांना हे हाॅस्पिटल दिले जात आहे.लातूरच्या जनतेला गृृहित धरून राजकारण करू नये.पालकमंञ्यांनी ऊस,कोविड प्रश्नावर कधी बैठक

घेतली का ? असा प्रश्न आ.निलंगेकर म्हणाले, आमच्याशिवाय पर्याय नाही,असे गृृृृहित धरून पालकमंञी राजकारण करित आहेत,दि.6 मे रोजी शहरातील प्रत्येक घरातून पिवळ्या पाण्याच्या बाटल्या घेऊन मनपाला देणार आणि सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलवर आंदोलन करण्याचा इशारा आ.निलंगेकर यांनी दिला.यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे,नेते शैलेश लाहोटी,मनपाचे स्थायी सभापती दीपक मठपती,नगरसेवक अजित पाटील कव्हेकर,प्रविण सावंत,मनिष भंडेवार उपस्थित होते.

Most Popular

To Top