महाराष्ट्र

लातूर जिल्ह्यातील रामलिंग मुदगड च्या कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पै.सुरज कोकाटे ठरला “रामलिंगेश्वर केसरी” चा मानकरी

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे रामनवमी निमित्त प्रती वर्षांप्रमाणे जंगी कुस्त्यांचे भव्य मैदान भरविण्यात आले.या मैदानासाठी राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातून पैलवानांनी हजेरी लावली होती.रामलिंग मुदगड हे गाव रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार यांची जन्मभूमी व कर्मभूमी असुन त्यांच्या ऐतिहासिक आठवणीना उजाळा

मिळावा,लाल मातीचा इतिहास त्यांच्याविना पुर्ण होणे अशक्य आहे.म्हणून अनेकांच्या सहकार्याने भव्य मैदानाचे आयोजन करण्यात आले.कोरोना महामारीमुळे दोन वर्षे कुस्ती मैदान झाले नाही.पण यावर्षी कोरोना चे सर्व नियम शिथिल झाल्याने प्रत्येकामध्ये मैदानाच्या आयोजनाबाबत उत्सुकता होती.श्री बजरंगबली हनुमान व पै.हरिश्चंद्र बिराजदार यांचे प्रतिमेचे पूजन करुन मैदानाला प्रत्यक्ष

सुरुवात करण्यात आले. हलग्यांच्या एकत्रित निनादामुळे संपूर्ण परिसर दणाणून निघाला तर कुस्ती निवेदक पै.महादेव मेहकरे यांनी राम राम मंडळी ची हाक देत आपल्या पहाडी आवाजातून कुस्ती प्रेक्षकांना कुस्ती इतिहासतील दाखले देत कुस्ती चे झंझावाती संचलन केले.मैदानात अनेक लढती प्रेक्षणीय ठरल्या. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे सराव करणारे अर्जुनवीर

काकासाहेब पवार यांचे पठ्ठे आंतरराष्ट्रीय पैलवान पै.जोतिबा आटकळे,महाराष्ट्र चॅम्पियन पंकज पवार,पै.देवानंद पवार, पै.मुंतजीर सरनोबत,पै.अक्षय शेळके यांनी प्रेक्षणीय कुस्त्या करत प्रेक्षकांची मने जिंकली. तर मैदानात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मल्ल,शिवछत्रपती पुरस्कार विजेते पै.कौत्सुभ ढापळे पुणे यांचा रोख इनाम देउन गौरव करण्यात आला.कुस्ती

मैदानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लातुर येथील न्यु लाईफ हार्ट केअर हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉ. बजरंग दुबे-मुदगडकर, सु स्पेशालिटी आयकॉन चे डॉ.प्रमोद घुगे, इसाक जमादार, जि.प सदस्य ज्ञानेश्वर बरमदे,प्रा.विष्णु पाटील, डॉ.वैजवाडे या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते मैदानातील शेवटची मानाची कुस्ती आशियाई सुवर्ण पदक विजेता पै.सुरज कोकाटे पुणे व पै सुरेश पाटील

उस्मानाबाद यांच्यात लावण्यात आली.या अत्यंत चुरशीच्या व तुल्यबळ लढतीत पुणे च्या सुरज कोकाटे ने प्रतीस्पर्धी पाटील यांना अस्मान दाखवत अक्का फाऊंडेशन च्या वतीने ठेवण्यात आलेली रामलिंगेश्वर केसरी ची मानाची चांदीची गदा आपल्या खांद्यावर घेतली. यावेळी मैदानाच्या शिस्तबद्ध नियोजनासाठी शिवछत्रपती पुरस्कार विजेते पै.ज्ञानेश्वर गोचडे व मुंबई कामगार केसरी पै.जिवन

बिराजदार,पै.प्रभाकर पाटील, पै.लहु गोरे,युवराज जोगी, पै.रामलिंग होगाडे,चंद्रकांत नाकाडे,पै.प्रभाकर हुलपल्ले,श्री नागेश गोरे,पै.संतोष दुधनाळे,विजय पाटील,विरभद्र होगाडे,अनंत हुलपल्ले,इराप्पा बिराजदार यांचेसह यात्राकमेटीतील सर्व पदाधिकार्यांनी परीश्रम घेतले.तर सदरील कुस्ती मैदान पाहण्यासाठी पंचक्रोशीसह जिल्हाभरातील कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.

Most Popular

To Top