लातूर जिल्हा

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महाराष्ट्र खाकी (लातूर) – राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमिताने शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला काँग्रेसचे नेते माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी गुरुवारी 11 वाजता पुष्पहार घालून अभिवादन केले यावेळी मोठया प्रमाणावर काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया

प्रमाणावर उपस्थित होते दरम्यान माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी उपस्थित सर्वांना जयंतीच्या निमीत्ताने शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार अँड त्रिंबक भिसे राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अँड श्रीपतराव काकडे,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे जिल्हा शहर काँग्रेस अध्यक्ष अँड किरण जाधव, महापौर विक्रांत गोजमगुंडे,

जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव संचालक पृथ्वीराज शिरसाठ,माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, मोहन माने, रेणा चे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले, बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, औसाचे सभापती राजेंद्र भोसले,काँग्रेसचे माध्यम जिल्हाध्यक्ष हारिराम कुलकर्णी, शहर निराधार योजनेचे

अध्यक्ष हकीम शेख, सचिन दाताळ, गणेश देशमुख, डॉ सुधीर पोतदार, बाळासाहेब जाधव, विजय कदम, प्रवीण कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, रामदास पवार, प्रवीण पाटील, सतीश पाटील, बिभीषण सांगवीकर, शिवाजीराव कांबळे, महेश काळे,आदी कोंग्रेसचे पदाधिकारी, समाजातील विविध स्तरातील मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Most Popular

To Top