लातूर जिल्हा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिलांसाठी थायरॉईड चेकिंग शिबिराचे प्रेरणा होनराव यांच्या हस्ते उदघाट्न

महाराष्ट्र खाकी (लातूर) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र उत्साहात आणि विवीध उपक्रम घेऊन साजरी होत आहे. लातूर शहरातील गवळीनगर भागातील स्थानिक नागरिकांच्या आणि ज्योतिबा लॅबरोटरी च्या माध्यमातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिलांसाठी अल्पदरात थायरॉईड चेकिंग शिबिर

आयोजित करण्यात आले होते. या थायरॉईड चेकिंग शिबिराचा शुभारंभ भाजप युवा मोर्चा च्या प्रदेश सचिव तथा मीडिया पॅनलिस्ट प्रेरणा होनराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रेरणा होनराव यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले. यावेळी गवळीनगर भागातील माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रेरणा होनराव यांचे युवा सहकारी वैभव कांबळे यांच्या पुढाकारातून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते याबद्दल त्यांचे प्रेरणा होनराव यांनी अभिनंदन करत कौतुक केले. या प्रसंगी वैभव कांबळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत कुटुंबियांशी संवाद साधला. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अंकुश गायकवाड , नगरसेवक सुमित भडीकर , ज्योतिबा पवळे , अजय कांबळे , वैभव कांबळे , किरणताई, पवळेताई, रोहिदास पवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Most Popular

To Top