महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूर शहरातील उस्मानपुरा येथील युवकांच्या कार्याचे केले कौतुक

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्हा आणि शहरातील लोकांनी आपल्या कार्यातून वेळोवेळी समाज कार्य करून समाजासमोर एक आदर्श निर्माण करत आले आहेत. असाच एक आदर्श घ्यावा असे कार्य लातूर शहरातील उस्मानपुरा येथील युवक करत आहेत. इस्लाम धर्मात पवित्र रमजान महिन्यात रोजे असतात. रमजान महिण्यात पहाटेच्या 5 पूर्वी सहेरी करावी लागते. ही सहेरी जे लोक आपल्या परिवारासोबत राहतात त्यानां सहज शक्य आहे. पण, शाळा, महाविद्यालयात शिक्षणासाठी हॉस्टेलवर राहणारे विद्यार्थी, रूग्णालयात उपचारासाठी असलेले

नातेवाईक यांची सहेरीची गैरसोय होउ नये यासाठी लातूर शहरातील उस्मानपुरा येथील काही युवकांनी एकत्रित येऊन घरपोच सेवा सुरू केली आहे. या सेवेसाठी 100 हून अधिक स्वयंसेवक सेवा देत असून लातूर शहरात 400 जणांना घरपोच डबा (सहेरी) दिला जात आहे. या कार्यासाठी अनेक जण मदतीचा हात पुढे करत आहेत. या कार्याचे कौतुक जिल्हाभर होत आहे. या कार्याचे आणि या युवकांचे लातूर शहर महानगरपालिकेचे महापौर यांनी विशेष कौतुक केले आहे.

महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले विशेष कौतुक,रमजान महिन्यात रोजे पकडत असताना बरेच विद्यार्थी किंवा कामानिमित्त बाहेर राहणाऱ्या मुस्लिम बांधवांना सहरीचा नाष्टा मिळण्यास अडचणी निर्माण होतात. अशा वेळी लातूरमध्ये सामाजिक बांधिलकी जपत अशा सुमारे 400 मुस्लिम बांधवांना पहाटे घरपोच डबा पोचवण्याचे सत्कार्य उस्मानपुरा बॉइज हे करत आहेत. ही गोष्ट खूपच कौतुकास्पद असून भारतातील जनतेमध्ये सहिष्णुता व ऐक्याची भावना किती खोलवर रुजलेली आहे याचे हे प्रतीकच आहे.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे