महाराष्ट्र

लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य लिंबन महाराज रेशमे यांचा वाढदिवस सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने उत्साहात साजरा

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, समाजसेवक, नेतृत्व, दातृत्व व कर्तुत्वसंपन्न तथा लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य लिंबन महाराज रेशमे यांचा वाढदिवस निलंगा तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने साजरा करण्यात आला. निलंगा तालुक्यातील सर्वांचे परिचयाचे असलेले लिंबन महाराज रेशमे हे समाजातील प्रत्येक घटकाच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असतात.

तो कोणत्या पक्षाचा किंवा जातीचा व्यक्ती आहे हे न पाहता तो एक व्यक्ती आहे आणि त्याची समस्या आपण सोडली पाहिजे या भावनेतून प्रत्येक व्यक्तीच्या समस्या सोडवण्याचे काम लिंबन महाराज रेशमे यांच्या वतीने केले जाते. लिंबन महाराज रेशमे यांना सर्व पक्षातील नेते हे मानतात. दिवसभर अनेक गावातील लोक येऊन महाराजांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.

पंढरपूर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष तथा नाथ संस्थान औसा चे प्रमुख गहिनीनाथ महाराज औसेकर व गोरखनाथ महाराज औसेकर यांनी शुभेच्छा दिल्या. महाराजांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख , राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे,काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर,प्रदेश सचिव अभय दादा साळुंके,तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, माजी पंचायत समिती सभापती अजित माने, माजी

नगराध्यक्ष हमिद शेख, रामलिंग पटसाळगे, प्रा. दयानंद चोपणे गोविंद, सूर्यवंशी,तसेच शिवसेनेचे मराठवाड्याचे संपर्कप्रमुख तथा शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे,संभाजीनगरचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर ,लातूर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने,शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटीका डॉ. शोभा ताई बेंजरगे, शिव सहकार सेनेचे जिल्हाप्रमुख विनोद आर्य, तालुकाप्रमुख

अविनाशदादा रेशमे,शिरूर अनंतपाळ तालुकाप्रमुख भागवत वंगे, देवनीचे तालुकाप्रमुख पंडित भंडारे,शहरप्रमुख सुनील नायकवाडे,शहर संघटक हरिभाऊ सगरे,युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.अण्णासाहेब मिरगाळे,तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे,व्यापारी आघाडीचे तालुकाप्रमुख प्रसाद मठपती, किशन मोरे,शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख मुस्तफा शेख,शिवाजी चव्हाण,माजी तालुकाप्रमुख बालाजी माने, अशोक

सूर्यवंशी, बालाजी पाटील,उपशहरप्रमुख माधव नाईकवाडे,शाखाप्रमुख शहजाद शेख,राहुल बिराजदार, महिला तालुकाप्रमुख रेखाताई पुजारी, शहरप्रमुख देवता सगर,सर्कल प्रमुख मंगलाबाई कांबळे, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाप्रमुख लायकपाशा शेख, संगायो समितीचे सदस्य व्‍यंकटराव पांचाळ,यशवंत बसपुरे,अजिंक्य लोंढे,
सोपान लोहरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पंडितराव

धुमाळ,विनायक बगदुरे,शहर प्रमुख इस्माईल लदाफ,युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे, अशोक काडादी,पत्रकार परमेश्वर शिंदे एसटी कामगार सेना, डॉक्टर असोसिएशन,तपोवन ग्रुप,निलंगा,शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्यातील हजारो शिवसैनिकांनी शुभेच्छा दिल्या. सायंकाळी शिवसेना व युवा सेनेच्या वतीने उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.

Most Popular

To Top