पोलीस

लातूर LCB ची कामगिरी 2 लाख 97 हजार रु. दागिन्याच्या मुद्देमाला सह दोन आरोपींना केली अटक

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर स्थानिक गुन्हे शाखा LCB चे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील बरेच कठीण गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांच्या टीमला यश येत असते. पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे गजानन भातलवंडे यांचे प्रयत्न सुरू होते .

त्या अनुषंगाने माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला  माहिती मिळाली की, पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी हा त्यांचे राहते घरी येणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथक तात्काळ औसा तालुक्यातील भादा या ठिकाणी पोचून तेथे सापळा लावला. थोड्याच वेळात त्याचे राहते घरातून संशयित आरोपी नामे आकाश उर्फ बाबूराव कांबळे, वय 21 वर्ष, यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या इतर साथीदारांसह लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबूल केले.

त्यावरून त्याचे साथीदार नामे माणिक बालाजी नरवटे, वय 35 वर्ष, राहणार तांबटसांगवी तालुका अहमदपूर येथून ताब्यात घेऊन त्यांनी विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी चोरी करून मिळवलेले सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 02 लाख 97 हजार 400 रुपयांचे दागिने त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत तसेच त्याचे इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. आरोपींनी त्याच्या इतर साथीदारांसह पोलीस ठाणे 1)जळकोट,2)अहमदपूर,3)किल्लारी,4) उदगीर ग्रामीण 5) विवेकानंद चौक च्या हद्दीमध्ये घरफोडीचे 8 गुन्हे केल्याचे कबूल करून 6 गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल हजार केला.

आरोपींना पोलीस स्टेशन विवेकानंद चौक येथे दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 142/2022 कलम 454, 457,380 भा द वि मध्ये अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन विवेकानंद चौक चे पोलीस अधिकारी व अंमलदार करीत आहेत.
हि कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बहुरे, सहाय्यक फौजदार संजू भोसले, पोलीस अमलदार राम गवारे, सुधीर कोलसुरे ,बंटी गायकवाड, माधव बिलापटे, सिद्धेश्वर जाधव , नाना भोंग सचिन धारेकर, जमीर शेख, नकुल पाटील,केंद्रे ,यांनी पार पाडली.

Most Popular

To Top