आमदार अभिमन्यू पवार यांना नाव न घेता “पिए आमदार” विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हणाले का ?

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप  ) – भाग्यश्री सुडे खून प्रकरणावर बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांचा नाव न घेता उल्लेख पिए आमदार असा करून टिका केली आहे. लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.शिवाजी काळगे यांच्या प्रचार

सभेत अहमदपूर येथे  विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणात बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांना नाव न घेता पीए आमदार असा उल्लेख करत भाग्यश्री सुडे ला न्यायमिळवण्यासाठी फक्त फास्ट टॅग कोर्ट आणी SIT चौकशीची फक्त मागणी केली पण पुढे काहीच केले नाही असा आरोप करत अमित देशमुख यांना

म्हणाले कि अमित देशमुख तुम्हाला उद्या काँग्रेस मध्ये चांगले भविष्य आहे, उद्या मोठी झाल्यावर मंत्रिमंडळात हा प्रश्न लावून धरून भाग्यश्री सुडे या मुलीला न्याय द्या असे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, पण देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे, विश्वासू आणी लाडके आमदार अभिमन्यू पवार यांना नाव न घेता पिए आमदार म्हणून जहरी टिका केली आहे, आता अभिमन्यू पवार वडेट्टीवर यांच्या या टिकेला का उत्तर देतात ते पाहू .

Recent Posts