महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या नोटिशीचा निषेध म्हणून नोटीस जाळून महाविकास आघाडी सरकारचा लातूर मध्ये निषेध करण्यात आला

महाराष्ट्र खाकी (लातूर) – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवून फोन टॅपिंग प्रकरणी रविवारी बीकेसीतील सायबर पोलीस ठाण्यात जबाबासाठी बोलावले होते.पोलिसांनी नोटीस पाठवून जबाबासाठी बोलविल्याची माहिती स्वत: फडणवीस यांनीच शनिवारी दिली.

त्यानंतर सायंकाळी फडणवीस यांनीच सहपोलीस आयुक्तांनी फोन करून तुम्ही पोलीस ठाण्यात येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून माहिती घेऊ, अशी माहिती ट्विटरवरून दिली. देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावल्यानंतर भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यातील विविध ठिकाणी भाजपा आंदोलन करुन निषेध व्यक्त करत आहे.

तसेच भाजपा कार्यकर्त्यांकडून राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. लातूर मध्येही जिल्हा अध्यक्ष आमदार रमेशअप्पा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर या ठिकाणी राज्य सरकारच्या या नाकामी कृत्याविरोधात नोटीस जाळून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. या वेळी अनेक पधादिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Most Popular

To Top