महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री,अमित देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या संकल्पनेतून आणि लातूर जिल्हा डॉक्टर काँग्रेस विभाग यांच्या माध्यमातून दिनांक 14 ते 20 मार्च दरम्यान जगप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर जिल्ह्यातील 2100 ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र चिकित्सा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात ज्या वेक्तींचे तपासणी आणि शास्त्रक्रिया होणार आहेत.लातूर जिल्हाभरातील रुग्णाची गैरसोय होऊ नये याकरिता दिनांक 14 ते 20 मार्च दरम्यान साम्भंधित तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय व स्वर्गीय विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय,लातूर ( OPD 4 ) अश्या एकूण 63 ठिकाणी त्यांची प्राथमिक तपासणी केली जाणार आहे आणि सोबत रुग्णांनच्या आणि नातेवाईकांच्या राहण्याची सोय, चस्मा, औषधे,आणि इतर सुविधा देण्याचा प्रयत्न असेल असे जिल्हा अध्यक्ष श्रीशैल उटगे आणि जिल्हा डॉक्टर अध्यक्ष अरविंद भातांब्रे म्हणाले.
लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या मार्गदर्शनात मागच्या वर्षी कोवीड च्या कठीण काळात मोठा रक्त साठा संकलन करून जिल्हा काँग्रेस कडून अमित देशमुख यांना शुभेच्छा दिल्या होत्या यात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सर्व दलाचे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती. या वर्षी पण तिमिरातूनी तेजाकडे या उपक्रमातून लातूर जिल्ह्यातील 2100 ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र चिकित्सा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.