महाराष्ट्र खाकी ( लातूर )– भारतीय राज्याघटनेत केंद्रचा प्रतिनिधी म्हणून राज्यपाल या पदास घटनेद्वारे विशेष अधिकार दिलेले असून या पदावरील व्यक्तीने निष्पक्षपातीपणे आणि घटनेच्या चौकटीत राहून काम करणे अभिप्रेत आहे. परंतु दुर्दैवाने राज्यपाल हे केंद्राचे हस्तक म्हणून आणि केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे प्रचारक म्हणून काम करीत असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्राने देश स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वीपासून पुरोगामी
विचार रुजविलेले आहेत.राज्यातील शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार भारताने नव्हे तर जगाने स्वीकारलेला असताना सुद्धा मनुवादी विचाराचे राज्यपाल जागतिक यौद्धे,जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरूबाबत तथ्यहीन टिपण्णी करतात, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत जाणीवपूर्वक बदनामीकारक वक्तव्य करतात जेणे करून समाजात तेढ निर्माण करण्याचे आणि उच्चवर्णी यांची तळी उचलण्याचे काम करत असल्याचे दिसुन येते.
महाराष्ट्रचे राज्यपाल घटनात्मक पदावर असताना निर्णय
प्रकियेत जातीय व पक्षीय विचार ठेऊन वागत आहेत एवढेच नाही तर मा. उच्चान्यायाल्याने अनेक प्रकरणात दिलेल्या निर्देशाकडे दुर्लक्ष करून एक प्रकारे घटनेचा अवमान व अनादर सातत्याने करीत आहेत. उच्चान्यायाल्याने राज्यपालाच्या बेजबाबदार कार्यप्रणालीवर ताशेरे ओढलेले आहेत, अशा व्यक्तीस
राज्यपाल पदावर राहणे हे लोकशाहीस घातक आहे म्हणून मा.राष्ट्रपती महोदयांनी घटनात्मक पदाचे अवमूल्यन करणाऱ्या भगतसिंह कोऱ्यारी यास परत बोलवावे व
भारतीय राज्याघटनेचा सन्मान करावा.
असे परिपत्रक लातूर येथील विधिज्ञ अँड. उदय गवारे, अँड. वसंत उगले, अँड.विजय जाधव, अँड.मधुकर राजमाने, अँड.गोविंद सिरसाट, अँड.सुधाकर अरसुडे, अँड. गणेश यादव, अँड. महेंद्र इंगळे, अँड. बी.जी. कदम, अँड.धनराज झाडके, अँड.सुरेश अगरकर, अँड. चंद्रकांत मेटे, अँड. एस. एम. कोतवाल, अँड. आर. के. चव्हाण, अँड.फारुख शेख अँड.प्रशांत काळदाते, अँड.शिवकुमार बनसोडे, अँड.जैनुदीन शोख, अँड.शेखर हविले,
अँड.इंद्रजीत गोरे, अँड. भालचंद्र कवठेकर, अँड.योगेश शिंदे, अँड.विशाल इंगोले, अँड.धनंजय भिसे, अँड.सुशील सोमवंशी, अँड.अंगद गायकवाड, अँड.संजय पाटील, अँड.इंद्रजीत सराटे, अँड.बशीर शेख, अँड.भगवान साळुंके, अँड.ए.बी.शेख, अँड.सुमित खंडागळे,अँड.राजेश खटके, अँड.प्रदीप पाटील आदींनी प्रसिद्धीस दिले आहे.