महाराष्ट्र खाकी (लातूर) – महाराष्ट्रात सुगंधी तंबाखू गुटका विक्री बंदी आहे. तरी देखील काही व्यापारी आर्थिक फायद्यासाठी सुगंधी तंबाखू गुटका अवैद्या मार्गाने विक्री करतात. या विरुद्ध पोलिस वेळोवेळी कारवाई करून गुटका जप्त करतात आणि विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल करतात.o
आणि त्या पकडलेल्या सुगंधी तंबाखू गुटका याची मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब कोर्ट यांच्या आदेशाने नष्ट करतात. लातूर शहरातील गांधी चौक पोलिसांनी 2021 मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून प्रतिबंधित अन्नपदार्थ सुगंधी तंबाखू गुटका जप्त करून गुन्हे दाखल करून कार्यवाही केलेली होती. त्यापैकी सहा गुन्ह्यातील एकूण 3834447/- रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थ नाश करण्याची मा. मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब कोर्ट लातूर यांनी परवानगी दिल्यावरून आज रोजी अन्न सुरक्षा अधिकारी लातूर
श्री.विठ्ठल लोंढे, पोलीस निरीक्षक श्री प्रेमप्रकाश माकोडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लोंढे, पोलीस उपनिरीक्षक कल्याण नेहरकर, व्यंकटराव कव्हाळे, पोलीस हवालदार मुरलीधर सूर्यवंशी, दयानंद आरदवाड, युसुफ शेख, गोविंद सरवदे पोलीस नाईक धनंजय गुटे, रणजित शिंदे, दत्ता पाटील पोलीस शिपाई महादेव मामडगे यांनी पंचांच्या समक्ष सदरील जप्त गुटखा, सुगंधी तंबाखू असा एकूण 3834447/- रुपयांचा मुद्देमाल वरवटी येथील महानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड मध्ये जाळून नष्ट केलेला आहे.