महाराष्ट्र खाकी ( उमरगा ) – उमरगा शहरातील महावितरण कार्यालयाच्या शेजारी महादेव संभाजी उबाळे यांचे वाहनांच्या स्पेअर पार्ट साहित्याचे ऑटोमोबाईलचे दुकान आहे. बुधवारी रात्री नऊ वाजता दुकान बंद करून घरी गेले. रात्री सव्वा दहाच्या सुमारास दुकानचा पत्रा उचकटळेला दिसल्याने शेजारील हॉटेल मालकाने उबाळे यांना माहिती सांगितली. दुकान उघडुन पाहिले असता गल्यामधील 46 हजार रुपये दिसून आले नाही.
दरम्यान याच दुकानातील कामगार भरत दत्ता ईंगवे यांच्यावर चोरीचा संशय असल्याची माहिती उबाळे यांनी पोलिसांना दिल्याने रात्रीची गस्त करणारे पोलिस उपनिरीक्षक विकास दांडे यांनी त्या दोन चोरट्यांचा तातडीने शोध घेण्यासाठी नियोजन आखले. बाबासाहेब कांबळे, अक्षय गांजले, हारूण सय्यद, खतीब, अतुल
जाधव या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन उपनिरीक्षक विकास दांडे संशयित आरोपी भरत दत्ता इगवे याच्या औराद गावी पोहोचले, तेथे घरी तो नव्हता. पुन्हा रात्री शोधाशोध सुरू असताना उमरग्यातील स्मशानभूमीजवळ आरोपी वापरत असलेली काळी स्कुटी दिसून आली.
मोबाईलच्या स्टॉर्चने स्मशानभूमी परिसरात शोध घेत असताना पोलिसांना पाहुन भरत इगवे पळाला. त्याच क्षणी उपनिरीक्षक विकास दांडे व कर्मचाऱ्यांनी बाजुच्या मदनानंद कॉलनी ते बाजूच्या शेतापर्यंत त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. तर दुसरा आरोपी मारूती गोविंद गरड यालाही पोलिसांनी चालाखीने ताब्यात घेतले. चोरलेली 46 हजारांची रक्कम हस्तगत केली. महादेव उबाळे राहणार कवठा यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान दि. 27 गुरूवारी न्यायालय समोर हजार केले असता दोघा आरोपींना दि 29 शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान कवडे तपास करीत आहेत.