महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्याला वैद्यकीय शिक्षण खात अमित देशमुख यांच्या स्वरूपात मिळाले. कोरोनाच्या कठीण काळात वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून त्याचे कार्य उल्लेखनीय आहे.वैद्यकीय शिक्षण खात्याला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न अमित देशमुखांनी केला आहे आणि करतही आहेत. पण त्यांच्याच जिल्ह्यातील शासकीय विलासराव देशमुख वैद्यकीय कॉलेज मध्ये वैद्यकीय शिक्षण खात्याचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत असे चित्र सध्या लातूर मध्ये दिसत आहे. वैद्यकीय शिक्षण खात्यानुसार वैद्यकीय कॉलेज मध्ये विद्यार्थ्याना शिकवणारे शिक्षक डॉक्टर (लेक्चरर) यांना बाहेर प्रॅक्टिस म्हणजे दवाखाना चालवता येत नसतो.
पण इतका साधा नियम लातूर येथील शासकीय विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात सर्रास मोडला जात आहे. यासर्व गोष्टींवर वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन डॉ.सुधीर देशमुख यांनी नियंत्रण ठेवायला पाहिजे पण डॉ.सुधीर देशमुख यांच्याकडून असे काही होत असताना दिसत नाही. याबद्दल डॉ.सुधीर देशमुख यांना विचारणा केली असता त्यानीं उडवा उडवीची उत्तरे दिली. म्हणजे तुमच्या नजरेत असे कोन असेल तर आम्हाला तक्रार करा, आमच्या नजरेत असे कोनी नियम मोडत नाहीत, खरे तर त्यांच्या जवळचे काही डॉक्टर आहेत! . नियम मोडणाऱ्या डॉक्टरांना वरदहस्त कोणाचा म्हणावे लागेल असा प्रश्न निर्माण होत आहे. आणि या निष्काळजी पणामुळे कोरोना काळात आणि मागील दोन वर्ष उत्तम काम करणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या कार्यालय कुठेतरी गालबोट लागतय!
नियम मोडणाऱ्या डॉक्टरांनी आपण सापडणार नाही याची चांगलीच काळजी घेतली आहे. म्हणजे हॉस्पिटल आपल्या पत्नीच्या, मित्राच्या किंवा नातेवाईकांच्या नावे चालू करून आपण व्हिजिटर डॉक्टर आहोत असे दाखवणे, किंवा मोठ्या हॉस्पिटल मध्ये पगारी नोकरी करणे म्हणजे त्यांच्यावर काही कारवाई होऊ नये. एक मात्र खर आहे मोठ्या अधिकाऱ्यांच्या शांत बसल्यामुळे आणि बघ्याची भूमिका घेतल्यामुळे वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्या कारभाराला डाग लागत आहे तेही स्वतःच्या जिल्ह्यातून ही मोठी शोकांतिका आहे. पण महाराष्ट्र खाकी या नियम मोडणाऱ्या डॉक्टरांची नावे पुराव्यासहित पुढील काळात वाचका समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे!